व्हॉट्सअॅप चॅनल आता पंतप्रधान मोदींनी केलं जॅाईन, तुम्ही त्यांना कसं फॅालो करणार

WhatsApp channel is now joined by Prime Minister Modi, why did you join it?
वेगवान
मेटा-मालकीचे इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप चॅनेलने अलीकडेच टेलीग्राम प्रमाणेच एक नवीन चॅनेल वैशिष्ट्य जारी केले आहे. व्हॅाटस्अप या सोशल मेसेजिंग अॅपमध्ये व्हॅाटस्अप चॅनलचे फिचर नुकतेच अपडेट करण्यात आले आहे. यामुळे आजचा जमाना हा आनलाईनचा असल्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्वरीत त्याचे व्हॅाटस्अप चॅनल निर्माण केले आहे. आता मोदींची जर काही माहिती तुम्हाला मिळवायची असेल तर तुम्ही त्यांना कसं फॅालो करणार ते घ्या जाणून. Narendra Modi Whatsapp Channel
हे सर्व करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम तुमचं व्हॅाटस्अप प्ले स्टोअर मध्ये जावून अपडेट करावे लागणार आहे. ज्या ठिकाणी स्टेटस दिसत होते त्या ठिकाणी अपडेट असे नाव दिसत आहे. आणि आपण जर अपडेटला क्लिक केल्यास तुम्हाला खााली गेल्यानंतर चॅनल दिसण्यास सुरुवात होईल.
वापरकर्त्याने चॅनेल फॉलो केल्यास, त्याचा फोन नंबर चॅनल अॅडमीन किंवा इतर फॉलोअर्सला दिसणार नाही. याशिवाय चॅनल अॅडमिनिस्ट्रेटरला स्क्रीनशॉट आणि फॉरवर्ड ब्लॉक करण्याचा पर्यायही देण्यात आला आहे. तुम्ही सर्च मध्ये चॅनल शोधु शकता असा पर्याय देण्यात आला आहे.
व्हॉट्सअॅप चॅनेलवरील पहिल्या पोस्टमध्ये, पीएम मोदी म्हणाले, “व्हॉट्सअॅप समुदायात सामील होण्यासाठी उत्सुक आहे! आमच्या सतत संवादाच्या प्रवासातील हे आणखी एक पाऊल आहे. चला येथे कनेक्ट राहूया! नवीन संसद भवनाचे हे चित्र आहे…” आता पंतप्रधानांच्या व्हॉट्सअॅप चॅनेलचे २ लाख २७८१४ पेक्षा जास्त फॉलोअर्स झाले आहेत.
या फीचरच्या मदतीने सेलिब्रिटी स्वतःचे व्हॉट्सअॅप चॅनल तयार करू शकतात आणि सामान्य वापरकर्ते त्यांच्याशी थेट कनेक्ट होऊ शकतात. व्हॉट्स अॅपमध्ये चॅनल हा पर्याय दिसत असून तिथं विविध सेलिब्रेटींची चॅनल आपल्याला दिसतात. तिथंच वापरकर्ते सेलिब्रेटींना फॉलो करू शकतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हॅाट्सअप चॅनला तुम्ही खालील लिंकवरुन फाॅलो करु शकतात.