गोदावरी रेल्वे बोगीमध्ये श्री ची वाजत-गाजत स्थापना

वेगवान नाशिक/Nashik,नाशिक,
अविनाश पारखे,मनमाड,नांदगाव –
गेल्या 27 वर्षापासून अखंडपणे सुरू असलेल्या मनमाड-मुंबई गोदावरी एक्सप्रेस मध्ये मासिक पासधारक तसेच प्रवासी संघटनेचे काही सदस्य यांच्यावतीने श्री ची स्थापना मोठ्या हौसेने केली जाते.
यंदा गोदावरी एक्सप्रेस ही सध्या स्पेशल म्हणून धुळे इथून सोडली जाते.तरीही आठवड्यातील काही दिवस ती मनमाड मधून सोडली जाते.
परंपरा अखंडित राहावी म्हणून सालाबादप्रमाणे तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून गोदावरी एक्सप्रेस गणेश मित्र मंडळाने रेल्वेच्या बोगीमध्ये श्री ची स्थापना केली.
यावेळी मंडळाचे सदस्य,प्रवासी,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.आमदार महोदयांनी बँड पथकाच्या तालावर ठेका धरत नाचत श्रींचे स्वागत केले.
यावर्षी तरी श्री पावतील आणि गोदावरी एक्सप्रेस नियमितपणे मनमाड मधून सुटेल यासाठी श्री आशीर्वाद देतील,सर्वांना सद्बुद्धी देतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.