Businessआर्थिकनाशिक ग्रामीणनाशिक शहरमहाराष्ट्रराजकारण

आयटीआय मध्ये पीएम रन फॉर स्किल व पदवीदान समारंभ मोठ्या उत्साहात साजरा


वेगवान नाशिक/Nashik/अविनाश पारखे, मनमाड, नांदगाव-

विश्वकर्मा पुजन दिन व मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय आयटीआय,  नांदगांव येथे “PM रन फॉर स्किल” व प्रशिक्षणार्थी “पदवीदान सोहळ्या” चे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व विश्वकर्मा प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.या प्रसंगी श्रीमती अर्पणा कुलकर्णी,प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था,नांदगाव,श्री.नितीन खंडागळे, पीआय,नांदगाव,श्री.बहाकर,पीएसआय,नांदगाव तसेच श्री.पंकज खताळ,बीजेपी जिल्हाध्यक्ष, सौ.कसबे,आधार बहुउद्देशीय संस्था,श्री.शंकर धनवटे,लोको पायलट,क्रू लॉबी,नांदगाव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विविध व्यवसायातील प्रथम,द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला.

तसेच पीएम स्किल रन मध्ये प्रथम,द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावलेल्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व बक्षीस रकमेचा धनादेश देऊन गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमप्रसंगी सर्व श्री.शंकर धनवटे,नितीन खंडागळे,पंकज खताळ व विद्या कसबे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

संस्थेतील श्री.एम.डी.निकुंभ,गटनिदेशक तसेच सर्व कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.

सूत्रसंचालन श्री.पी.डी.राठोड व श्री.पी.एस. गायकवाड यांनी केले तर श्री.एस.टी.शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button