महाराष्ट्र

maharashtra rain पाऊसाचा हवामान अंदाज आज काय सांगतो, तीन चार तास महत्वाचे


वेगवान नाशिक / WEGWAN NASHIK

आजपासून राज्यात पुन्हा पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (maharashtra rain intensity of rain will decrease today maharashtra on orange alert weather update)
महिन्याभराच्या विश्रांतीनंतर विदर्भावर वरुणराजा मेरहबान झाला आहे. विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यात पावसाने पुन्हा एकदा जोरदार कमबँक केला आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. दोन दिवसांपासून विदर्भातील नागपूर, भंडारा, अमरावती जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळतो. या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका भंडारा जिल्ह्याला बसला आहे.

जळगाव पाऊस

जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावलीय. पावसामुळे निंबोल ऐनपुर गावाजवळील तापी नदीला पूर आल्याने या पुराचे पाणी निंबोल ऐनपुर गावातील अनेक घरात घुसलं. तसेच रावेर तालुक्यातील इतर गावांशी देखील संपर्क तुटलाय. मुसळधार पावसामुळे तापी नदीचे पाणी शेतात घुसल्याने शेतीचे देखील मोठे नुकसान झालंय.

17 सप्टेंबर, उपग्रहावरून सकाळी 
गुजरात, पूर्व मध्य प्रदेश, अ‍ॅड. राजस्थान उत्तर महाराष्ट्रातील गुदद्वारासंबंधीचा भाग मध्यम ते तीव्र ढगांनी झाकलेला आहे. पुढील ३.४ तासांत या भागांत अधूनमधून जोरदार पावसासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. नंदुरबार, धुळे नाशिक पालघर या जिल्ह्यात पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

राज्यात गणपतीच्या आगमानाची तयारी सुरु असताना मान्सून सक्रीय झाला आहे. आज राज्यात अनेक भागांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. आजपासून पुढील तीन ते चार दिवस राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तसेच राज्यातील काही जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button