महाराष्ट्रात कोठे कोसळणार मुसळधारा, कुठे कोणता अलर्ट बघा

राज्यातील विविध भागात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. येत्या ४८ तासांत पावसाचा आणखी जोर वाढणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे
आजही राज्यातील विविध भागात पावसाचा जोर दिसला. गेल्या २४ देशभरात अति मुसळधार पावसाची नोंद झाली. आज देशात कोकणातील दापोलीत सर्वाधिक २५ सेमी पावसाची नोंद झाली आहे. तर नाशिकच्या त्रंब्यकेश्वरमध्ये १५ सेमी पावसाची नोंद झाली आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांसाठी मुंबईत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत उद्या वादळी वारे आणि गडगडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर पालघर, रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि सिंधुदूर्ग जिल्हांना ‘येलो’ अलर्ट जारी करण्यात आला आहे.
णे हवामान केंद्राचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी देखील राज्यात पुढील २,३ आठवडे पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. होसाळीकर यांनी माहिती दिली आहे की, ‘आयएमडी मॉडेल मार्गदर्शनानुसार, पुढील २,३ आठवडे महाराष्ट्राच्या काही भागांसह देशातील बहुतांश भागात मान्सूनची सक्रिय राहील. ऑगस्टमधील अत्यंत कमी पावसानंतर हा बहुप्रतिक्षित पाऊस. त्यामुळे पाण्याचे साठे आणि पिके सुधारतील’.