आर्थिकनाशिक ग्रामीणमहाराष्ट्रराजकारण

आमदार सुहास कांदे यांच्यातर्फे रोजगार मेळावा संपन्न


वेगवान नाशिक/Nashik/नाशिक,

अविनाश पारखे,मनमाड,नांदगाव-

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांनी स्वतःचा वाढदिवस साजरा न करण्याचे जाहीर केले आणि मतदार संघातील नागरिकांसाठी विविध सुविधांचे लोकार्पण करण्याचे आयोजन केले. याचाच एक भाग म्हणून मतदारसंघातील तरुणांसाठी नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली.आमदार सुहास कांदे यांच्यातर्फे मनमाड येथील संपर्क कार्यालयात बेरोजगार व्यक्तींसाठी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी रिंग गेअर अक्वा,शारदा मोटर्स,बजाज सन्स,हिताची जळगाव,एम डी इंडस्ट्रीज, एलआय सी,महिंद्रा अँड महिंद्रा,टपारिया टूल, सतीष टॉय,वैष्णवी ऑटो,किंप क्लॉथ,आर्ट रबर, व्हीआयपी तसेच नाशिक,सिन्नर येथील 30 हून अधिक कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या रोजगार मेळाव्यास मतदारसंघातील तरुण- तरुणींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नोकरी करिता मुलाखत दिली.तब्बल 1133 उमेदवारांनी नोकरीसाठी मुलाखत दिली तर यातील 776 मुलांना तात्काळ ऑफर लेटर देण्यात आले.

युवासेना जिल्हाध्यक्ष फरहान खान,अल्ताफ खान, उप जिल्हाप्रमुख सुनील हांडगे, तालुकाप्रमुख साईनाथ गिडगे,शहर प्रमुख मयूर बोरसे,बबलू पाटील,सौ.संगीता बागुल,विद्या जगताप,पुजा छाजेड यांच्या हस्ते ऑफर लेटर देण्यात आले.

या मेळाव्याचे नियोजन रवी देवरे,सरचिटणीस औद्योगिक कामगार सेना यांनी केले होते. आमदार सुहास कांदे यांच्या नांदगाव,मनमाड, मालेगाव येथील संपर्क कार्यालयात नोकरी नोंदणी सुरू राहणार असून प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेला संबंधीत पात्र व्यक्तींना मुलाखतीसाठी इच्छुक उमेदवारांना नाशिक येथे बोलावले जाणार असून त्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगितले.

या वेळी युवासेना शहराध्यक्ष योगेश इमले, आसिफ पहिलवान,गालिब शेख,अमीन पटेल, आझाद पठाण,आमीन शेख,राकेश ललवाणी, किशोर लहाने,अंकूश कातकडे,वाल्मीक आंधळे, लाला नागरे,सुभाष माळवतकर,दिनेश घुगे,निलेश ताठे,अज्जू शेख,रमेश दरगुडे,विशाल सुरवसे, लोकेश साबळे,सिद्धार्थ छाजेड, अजिंक्य साळी,अज्जू पठाण,स्वराज देशमुख, रिशिकांत आव्हाड,धनंजय आंधळे,स्वराज वाघ, अमोल दंडगव्हाळ,प्रमोद अहिरे,मन्नू शेख,प्रमोद राणा,कुणाल विसापूरकर,सचिन दरगुडे,निलेश व्यवहारे,शहर संघटक नीतू परदेशी,सावित्री यादव उपस्थित होते.

तसेच आज 6 सप्टेंबर 23 रोजी 9 पाण्याचे टँकर,3 नवीन सुसज्ज रुग्णवाहिका,1 मोफत फिरता दवाखाना,1 मोफत शासकीय सुविधा केंद्र,2 वैकुंठ रथ,दिव्यांग बांधवांकरिता 100 सायकल,मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया स्वतंत्र बस इत्यादी सेवांचा लोकार्पण संपन्न होणार असल्याची माहिती प्रतिनिधी कडून मिळाली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button