Zomato Share जेवन पोहच करणा-या झोमॅटोची शेयर बाजारात धूम मचाले..

Zomato Share Zomato Share, which delivers food, made a splash in the market.
मुंबईः झोमॅटोच्या शेअरला एकदम तरतरी आली आहे. कारण झोमॅटोच्या शेयर मधील गुंतवणूक करणा-या लोकांना याचा चांगला फायदा होतांना दिसून येते आहे. मागील काही दिवसापूर्वी झोमॅटोच्या शेयर खुपच खाली आले होते. मात्र आज झोमॅटोला चांगले दिवस सुरु झाल्याचे चित्र आज शेयर बाजारात दिसून आले यामागे मोठं कारण आहे.
या कंपनीचा शेअर अचानक वधारला. गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला. सुरुवातीच्या काळात लंडनमधील सॉफ्टबँक व्हिजन फंडने (SoftBank Vision Fund-SVF) या कंपनीत मोठी गुंतवणूक केली होती. या बँकेने जवळपास 940 कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली होती. आता हे शेअर या फायनेन्शिअल फर्मने विक्री केले आहे. त्याचा फायदा झोमॅटोला होईल, असा तज्ज्ञांचा दावा आहे.
SVF ग्लोबलने बुधवारी झोमॅटोचे 10 कोटींहून अधिकच्या शेअरची विक्री केली आहे. या शेअरची विक्री 94.7 रुपयांच्या ब्लॉक डीलच्या रुपाने करण्यात आली. त्यामुळे बाजारात 947 कोटी रुपयांचे शेअर आले. त्याचा फायदा झोमॅटोला झाला. कंपनीच्या शेअरमध्ये मोठी वाढ दिसून आली.
बाजाराच्या पहिल्या सत्रातच झोमॅटोचा शेअर 5 टक्क्यांनी वधारला. हा शेअर चढून 99 रुपयांवर पोहचला. आता दोन दिवसांत हा शेयर्स किती रुपयांपर्यंत जातो याकडे शेयर बाजारातील गुंतवणूक दारांचे लक्ष आहे.
डनमधील सॉफ्टबँक व्हिजन फंडने 10 कोटींहून अधिकच्या शेअरची विक्री केली आहे. त्यापाठोपाठ गुंतवणूक फर्म टायगर ग्लोबल मॅनेजमेंटने त्यांची पूर्ण 1.44 टक्के हिस्सेदारी विकली. हा वाटा बल्क डीलमध्ये विक्री करण्यात आली. हा सौदा जवळपास 1123 कोटी रुपयांचा झाला. त्यामुळे झोमॅटोचा शेअर झपाट्याने वधारला.
सॉफ्टबँकेने झोमॅटोतील 1.17 टक्के हिस्सेदारी विकली.झोमॅटोने गेल्या वर्षी ग्रोसरी डिलिव्हरी फर्म ब्लिंकईटचे अधिग्रहण केले होते. मागे हे शेयर्स 60 रुपयांपर्यंत येऊन पोहचले होते. मात्र त्या वेळी ज्या लोकांनी गुंतवणूक केली असेल त्यांना आज 99 रुपये पर्यंत शेयर्स गेल्यामुळे धूम मचाले धूम असेच झाले आहे.