वेगवान नाशिक/Nashik/अविनाश पारखे,
मनमाड,नांदगाव –
होळी सणाच्या पार्श्वभूमीवर मनमाड शहरामध आज अनोख्या पद्धतीने होळी साजरी करण्यात आली.
मनमाड शहरातील व्यापारी बाजारपेठेत सुभाष रोड येथे व्यापाऱ्यांच्या वतीने ॲमेझॉन,फ्लिपकार्ट यासारख्या इ- कॉमर्स ऑनलाइन विक्री करणाऱ्या कंपन्यांचे विरोधात प्रतिकात्मकरित्या होलिका दहन करून होळी साजरी करण्यात आली.
ऑनलाइन खरेदी विक्रीमुळे छोटे-मोठे दुकानदार यांच्यावर संक्रांत ओढवली गेली आहे असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त करत ऑनलाइन खरेदी करण्यापेक्षा प्रत्यक्ष दुकानात येऊन खरेदी करावी अशी अपेक्षा ठेवत ऑनलाइन कंपन्यांचे प्रतिकात्मकरीत्या होळीमध्ये दहन करून होळी साजरी करण्यात आली.
यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ पारिक यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी, सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या अनोख्या होलिका दहनाची चर्चा व्यापारी बाजारपेठेत होत होती.