वेगवान नाशिक/Nashik/नाशिक,
अविनाश पारखे,मनमाड,नांदगाव –
बेमोसमी पावसामुळे मनमाड शहरात रब्बी पिकाचे मोठे नुकसान झाले असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार 4 मार्च ते 6 मार्च 2023 या काळात बिगर मोसमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.
मनमाड शहरात रात्री 10 वाजेपासूनच ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट,सोसाट्याचा वारा यासह हलक्या पावसाच्या सरी पडू लागल्या.
रात्री 2 वाजेच्या सुमारास दमदार पाऊस झाला. त्याचबरोबर संपूर्ण रात्रभर ढगांचा गडगडाट व अधून मधून हलक्या सरी पडत होत्या.रात्री झालेल्या पावसामुळे मनमाड परिसरात कांदा,गहू काही प्रमाणात द्राक्षे या रब्बी पिकाचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सुसाट्याचा वारा आणि विजेच्या कडकडाटामुळे शहरात अधून मधून लाईट ये जा करत होती.
या काळात शेतकर्यांनी शेत पीक,शेत माल,जनावरे यांची काळजी घेण्याचे आवाहन वेगवान नाशिक करत आहे.