राक्षसांचा नाश करण्यासाठी येतोय Bholaa! अजय बॅक टु अ‍ॅक्शन मोड


वेगवान नाशिक

अभिनेता अजय देवगण सध्या त्याच्या आगामी ‘भोला’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 30 मार्च 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. ‘भोला’ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. आज सोशल मीडियावर चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे.

भोलामध्ये, अजय देवगण एका गुन्हेगाराच्या भूमिकेत आहे. जो गुन्हेगारांच्या टोळीपासून अंमली पदार्थाचे संरक्षण करण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यासोबत (तब्बू) सामील होतो.यात अजय फुल अ‍ॅक्शन मोड मध्ये दिसत आहे.

अजयचा लूक हे चित्रपटातील सर्वात मोठे आकर्षण आहे. तुफानी अॅक्शन आणि त्याला मसाला मनोरंजनचाही सामावेश भोलाचा ट्रेलर दिसत आहे.

हा चित्रपट अॅक्शन, थ्रिल आणि इमोशने भरलेला आहे. चित्रपटात अजय एका कैद्याच्या भूमिकेत आहे, तर तब्बू पोलिसाच्या भूमिकेत आहे. ‘दृश्यम 2’ नंतर अजय आणि तब्बूला पुन्हा पडद्यावर एकत्र पाहणे ही चाहत्यांसाठी मोठी भेट आहे.

यामध्ये दीपक डोबरियाल, संजय मिश्रा, विनीत कुमार आणि संजय मिश्रा यांचा समावेश आहे. अमला पॉल आणि अभिषेक बच्चन यांनी कॅमिओ भूमिका केल्या आहेत. संगीत केजीएफ संगीतकार रवी बसरूर यांचे असून छायाचित्रण असीम बजाज यांचे आहे.

‘भोला’ चित्रपटाबाबत बोलायचे झाले तर अजय देवगण याच्या दिग्दर्शनाची जबाबदारीही पार पाडत आहे. तो या चित्रपटाचा सहनिर्माताही आहे. विशेष म्हणजे ‘भोला’ हा तमिळ चित्रपट ‘कैथी’चा हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट 2019 साली प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये अभिनेता कार्ती दिसला होता. भोलाशिवाय अजय देवगणही मैदान या चित्रपटात दिसणार आहे.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *