वेगवान नाशिक
नाशिकः शहरात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची विक्री होत असल्याची बाब निदर्शनास येत असून भिवंडी येथून नाशिक शहर व मालेगावसाठी मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थाची तस्करी होत असल्याचे समोर येत आहे. तसेच नाशिक शहरात हुक्का पार्लर देखील मोठ्या प्रमाणावर सुरू असून याच्यावर देखील कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत बोलताना केली आहे.
Astrologyआजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांचे लवकरच विवाहाचे योग
याबाबत विधानसभेत चर्चा करताना मखमलाबाद रस्त्यालगत व गंगापूर रोडवर काही हॅाटेल व कॅफे हे अमली पदार्थांचे अड्डे झालेले आहे. पान टपरीवर अमली पदार्थ रात्री दोन पर्यंत खुले आम विकले जात आहे. असे नमूद करताना शहरातील काही शाळांमधील मुले हे देखील व्यसनाधीन होत असल्याबाबत चिंता व्यक्त केली. तसेच यापूर्वी देखील स्थानिक पोलिस प्रशासनाकडे याबाबत तक्रार दाखल केली असताना पोलिस प्रशासनाकडून याबाबत कारवाई झाले नसल्याचे आमदार फरांदे यांनी सांगितले आहे.
नवीन वर्षात अनेक नियमांमध्ये होणार बदल
तसेच नाशिक शहरात हुक्का पार्लर देखील मोठ्या प्रमाणात सुरू असून सदर ठिकाणी पाण्याच्या ऐवजी बियरचा वापर केला जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नशा होत आहे. त्याचप्रमाणे जुगाराचे बॅाल गेम यासारखे अनैतिक खेळते अड्डे खुलेप्रमाणे मुंबई नाका परिसरात सुरू आहे. या अनैतिक धंद्याकडे पोलिस प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्षाबाबत आमदार फरांदे यांनी नाराजी व्यक्त करताना या अमली पदार्थ व बेकायदेशीर धंद्यामुळे नाशिक शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढलेले असल्याचे सांगितले.
शेतकऱ्यांना सरकार देतेय या योजना, त्यातून कर्ज-विमा-पेन्शनसह मिळतात अनेक फायदे
तसेच अमली पदार्थांच्या विक्रीमुळे व हुक्का पार्लरमुळे मोठ्या प्रमाणावर शहरातील युवक व्यसनाधीन होत असल्यामुळे शहरातील अमली पदार्थाची विक्री थांबवणे, तसेच भिवंडी येथून मालेगाव व नाशिक येथे होणारी अमली पादर्थांची वाहतूक थांबविणे व हुक्का पार्लर वर तात्काळ कारवाई करण्याची विनंती फरांदे यांनी केलेली आहे.
नाकातून देण्यात येणा-या त्या लसीला केंद्र सरकारची मंजुरी