वेगवान नाशिक
गेल्या काही काळात अनेक आर्थिक नियमात बदल करण्यात आले आहे. तर आता काही दिवसांनी हे वर्ष संपणार असून नवीन वर्ष येण्याच्या तयारीत आहेत. तर या येणा-या नवीन वर्षात सरकार काही नवीन नियम बदलणार असून त्याचा परिणाम थेट तुमच्या खिशावर होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत नवीन नियम.
Astrologyआजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांचे लवकरच विवाहाचे योग
बँक लॉकरचे नवीन नियम- रिझर्व्ह बँकेने जारी केलेले नवीन लॉकर नियम 1 जानेवारी 2023 पासून लागू होतील. नियम लागू झाल्यानंतर बँकांना लॉकरबाबत ग्राहकांशी मनमानी करता येणार नसून लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूचे खूप नुकसान झाले तर त्याची जबाबदारी आता बँकेची असणार आहे. तसेच ग्राहकांना आता 31 डिसेंबरपर्यंत बँकेसोबत करार करावा लागणार आहे. क्रेडिट कार्ड नियमांमध्ये बदल- जर तुम्ही क्रेडिट कार्डधारक असाल तर आता क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये मोठा बदल होणार असून एचडीएफसी बँक आपल्या क्रेडिट कार्डच्या पेमेंटवर मिळालेल्या रिवॉर्ड पॉइंट्सचे नियम बदलणार आहे. यामध्ये तुमचे सर्व रिवॉर्ड पॉइंट 31 डिसेंबर 2022 पूर्वी भरा.
Share Market शेअर बाजारात पडझड, सेन्सेक्स ६००अंकांनी तर निफ्टी १४९ अंकांनी घसरण
जीएसटी ई-इनव्हॉइसिंगच्या नियमांमध्ये बदल- येणा-या नवीन वर्षापासून जीएसटी ई-इनव्हॉइसिंग किंवा इलेक्ट्रॉनिक बिलच्या नियमांमध्ये मोठा बदल होणार असून सरकारने आता 2023 पासून जीएसटीच्या ई-इनव्हॉइसिंगसाठी 20 कोटींची मर्यादा कमी करून 5 कोटी केली आहे. तर हा नवा नियम 1 जानेवारी 2023 पासून लागू होत आहे. एलपीजी किंमत बदल- गेल्या काही काळात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने घसरण होत असून अशा परिस्थितीत सरकारी तेल कंपन्यांच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात करून सरकार ग्राहकांना दिलासा देऊ शकते. तर नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सरकारकडून सरकारी तेल कंपन्या स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमती कमी करण्याची घोषणा करू शकतात, असे मानले जात आहे.
कार खरेदी करणे होणार महाग – जर तुम्ही 2023 मध्ये नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर एमजी मोटर, मारुती सुझुकी, ह्युंदाई मोटर, टाटा मोटर्स, मर्सिडीज-बेंझ, ऑडी आणि रेनॉल्ट या कंपन्यांनी त्यांच्या वाहनांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नवीन वर्षात कारच्या किमती वाढणार आहे.
महाराष्ट्रात जुनी पेन्शन योजना लागू होणार?