वेगवान नाशिक
मुंबईः राज्यात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून त्यात अनेक प्रकरणावर निर्णय दिले जात आहे. त्यातच मविआ सरकारच्या काळात बँकेचे कर्ज बुडवल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मोहित कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. परंतु आता कंबोज यांना मोठा दिलासा मिळाला असून या प्रकरणी पोलिसांनी क्लीन चीट दिली आहे.
Share Market शेअर बाजारात पडझड, सेन्सेक्स ६००अंकांनी तर निफ्टी १४९ अंकांनी घसरण
दरम्यान मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्या कार्यकाळात कंबोज यांच्यावर आर्थिक फसवणूकीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. संजय पांडे आणि मोहित कंबोज यांच्यातील वाद जोरदार चर्चेत होता. पण भाजपचे नेते मोहित कंबोज यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लीन चीट देण्यात आली आहे.
Astrologyआजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांचे लवकरच विवाहाचे योग
तसेच कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर संजय पांडे यांच्याविरोधात आर्थिक घोटाळे बाहेर आले होते. त्यानंतर संजय पांडे यांनाच काही दिवसांनी अटक झाली होती. तर कथित बँक घोटाळा प्रकरणात कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आता क्लीन चीट मिळाल्यानं कंबोज यांची आर्म्स ॲक्ट अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांमधूनही सुटका होणार आहे.
महाराष्ट्रात जुनी पेन्शन योजना लागू होणार?