आयपीएल लिलावात हा संघ ठरणार महागडा


वेगवान नाशिक

सध्या 23 डिसेंबरला आयपीएल 2023 साठी छोटा लिलाव होणार असून यासाठी 405 खेळाडूंना शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. या लिलावाची उत्सुकता आता शिगेला पोहचली असून कोणता संघ कोणत्या खेळाडूसाठी आपला खिसा रिकामा करणार याची जोरदार चर्चा सुरू आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी विशेष सावधगिरी बाळगा

तसेच आतापर्यंत इंडियन प्रीमीयर लीगचे 15 हंगाम पूर्ण झाले असून आता पुढीलवर्षी 16वा आयपीएल हंगाम खेळवला जाणार आहे. पण त्याआधी आयपीएलच्या या नव्या हंगामासाठी खेळाडूंचा छोटा लिलाव पार पडणार आहे. मात्र या लिलावापूर्वीच एक बातमी समोर येते, ते म्हणजे सनरायझर्स हैदराबाद खेळाडूंवर सर्वात जास्त पैसे खर्च करणार आहे. तर RCB आणि KKR सर्वात कमी पैसे खर्च करणार आहेत.

Gold Price Today सोने चांदीच्या दरात मोठी वाढ

तर या व्यतिरिक्त पंजाब किंग्ज, लखनौ सुपर जायंट्स, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे चार संघ आहेत ज्यांच्या खिशात 20 कोटींहून अधिक रक्कम आहे. तर दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर  आणि फाफ डू प्लेसिसचे कोलकाता नाईट रायडर्स हे दोन असे संघ आहेत जे लिलावात खूपच कंजूष दिसतील. चला तर मग जाणून घेऊया लिलावात कोणता संघ किती रक्कम घेणार.

आयपीएल लिलावात सनरायझर्स हैदराबाद खेळाडूंना खरेदी करण्यासाठी सर्वाधिक पैसे खर्च करणार असून खेळाडूंना सोडल्यानंतरही सनरायझर्स हैदराबादकडे सर्वाधिक 42.25 कोटी रुपये शिल्लक आहेत. दुसरीकडे, हैदराबादमध्ये सध्या 17 खेळाडूंचे स्लॉट रिक्त आहेत. ज्यामध्ये 13 भारतीय आणि 4 विदेशी खेळाडूंचा समावेश केला जाऊ शकतो. अशा स्थितीत सनरायझर्स मोठी रक्कम देऊन अनेक बड्या खेळाडूंना आपल्या संघात समावेश करू शकतात. तसेच आगामी लिलावात कोलकाता नाईट रायडर्सचा संघ सर्वाधिक कमी खेळताना दिसणार आहे. कारण आयपीएल लिलावासाठी कोलकाता नाईट रायडर्सची किंमत 7.05 कोटी रुपये आहे.

या कंपनीने गुंतवणूकदारांना दिला जबरदस्त परतावा

 

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *