वेगवान नाशिक
विधान परिषदेत खासदार राहुल शेवाळे यांनी एका महिलेवर बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली होती. त्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचा मुद्दा शिवसेना ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे यांनी उपस्थित केला. त्यानंतर डॉ. नीलम गोऱ्हे यांनी चौकशीचे आदेश दिले असून राहुल शेवाळे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी एसआयटी चौकशीचे आदेश राज्य सरकारला दिले आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी विशेष सावधगिरी बाळगा
तसेच विधान परिषदेत राहुल शेवाळे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांवरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने या गदारोळामुळे विधान परिषदेचे कामकाजही स्थगित करण्यात आले होते.
दरम्यान विधान परिषदेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे यांनी खासदार राहुल शेवाळे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपाचा मुद्दा उपस्थित केला असून त्यांनी म्हटले की, राहुल शेवाळे यांच्याविरोधात पोलीस आयुक्त यांच्याकडे देखील तक्रार केली आहे. मात्र पोलिसांचा पीडितेवर दबाव असून पीडित तरुणीला मुंबईत यायचे आहे. मात्र, दबावामुळे ती मुंबईत येऊ शकत नाही.
गुंतवणूकदारांसाठी चांगली बातमी! हा समूह नवीन IPO आणण्याच्या तयारीत
तर या प्रकरणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार केली असून या पीडित तरुणीच्या जीविताला धोका असल्याचे कायंदे यांनी म्हटले. आणि एसआयटी स्थापन करून राहुल शेवाळे यांची चौकशी करा अशी मागणी कायंदे यांनी केली आहे. त्यानंतर विरोधकांनी शेवाळे यांच्यावरील आरोपांची चौकशी करावी अशी मागणी लावून धरली होती. त्यानंतर यावर डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्य सरकारला एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले.
या पिकाची लागवड करून शेतकरी होणार श्रीमंत