देशात आता पुन्हा मास्क सक्ती होणार?


वेगवान नाशिक

गेल्या काही महिन्यांपासून कोरोना संसर्ग कमी झाला होता त्यामुळे मास्क सक्ती उठवण्यात आली होती. मात्र चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक पाहता त्याचे लोण भारतात येण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे देशात पुन्हा मास्कची सक्ती होईल असं बोललं जात आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी विशेष सावधगिरी बाळगा

तसेच याआधी केंद्रीय आरोग्य विभागाच्या वतीने कोरोनाच्या स्थिती बाबत आढावा बैठक घेत खबरदारी म्हणून गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावा अशा सूचना केल्या होत्या.अशी सर्व परिस्थिती असतांना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसद परिसरात मास्क सक्तीचा केला आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून मास्क सक्ती उठवण्यात आल्याने संपूर्ण देशातील नागरिकांना मास्कचा विसरही पडू लागला होता. परंतु पुन्हा एकदा मास्क लावण्याची वेळ नागरिकांवर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या कंपनीने गुंतवणूकदारांना दिला जबरदस्त परतावा

दरम्यान दिल्ली येथे संसद भवनात सुरू असलेल्या अधिवेशनाच्या दरम्यान संसद परिसरात मास्क सक्ती लावण्याबाबत विचार करण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होऊ नये याकरिता संसद परिसरातच मास्क बंधनकारक केला आहे.

याबाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया, आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्यासह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, तज्ज्ञ आरोग्य स्थितीची बैठक होत आहे. तर संपूर्ण जगात कोरोनाची स्थिती बघता या बैठकीत काही नियम पुन्हा लागू होण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये सामाजिक आंतर, मास्क सक्ती केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Gold Price Today सोने चांदीच्या दरात मोठी वाढ

 

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *