वेगवान नाशिक
नवी दिल्ली: गेल्या २४ तासांत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे, मात्र सरकारी तेल कंपन्यांनी आज अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दरात कोणताही बदल नसून आजही जैसे थेच आहेत. तर देशातील इंधनाच्या किमतीवर कसा परिणाम होत आहे हे जाणून घेण्यासाठी आजचे पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊया.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी विशेष सावधगिरी बाळगा
आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी उसळी पाहायला मिळत असून या आधारावर ब्रेंट क्रूडचा दर ८२ डॉलरच्या पुढे पार पोहोचला आहे, तर आज जागतिक बेंचमार्क ब्रेंट क्रूड प्रति बॅरल ८२.५४ डॉलरच्या दराने उपलब्ध आहे. तसेच डब्ल्यूटीआय क्रूड देखील प्रति बॅरल ८० डॉलरच्या जवळ आणि त्याचा दर प्रति बॅरल ७८.७१ डॉलरवर पोहोचला आहे.
अनिल देशमुख यांच्या याप्रकरणाच्या जामीनाला उच्च न्यायालयाची स्थगिती
तसेच देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह चार प्रमुख महानगरांमध्ये आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नसून ते कालच्या दरांवर स्थिर आहेत. तर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी , डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच सर्वसामान्यांना पेट्रोल आणि डिझेल वाढलेल्या किंमतीत विकले जाते.
कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय
प्रमुख महानगरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे दर
मुंबई- पेट्रोल १०६.३१ रुपये, डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर, दिल्ली- पेट्रोल ९६.७२ रुपये, डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर,
चेन्नई – पेट्रोल १०२.६३ रुपये, डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर, कोलकाता – पेट्रोल १०६.०३ रुपये, डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर प्रमाणे आहे.
रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता