वेगवान नाशिक
मुंबई: गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तब्ब्ल १८ वर्षानंतर टाटा समूहाच्या अनेक कंपन्या शेअर बाजारात आयपीओ आणण्याच्या तयारीत आहेत, ज्यामध्ये बिगबास्केट, टाटा प्ले, टाटा टेक्नॉलॉजीस सारख्यांचा समावेश आहे. तसेच टाटा समूहाची बिगबास्केट भारतभर आपला विस्तार करण्यावर भर देत असून पुढील २४ ते ३६ महिन्यांत आयपीओ लॉन्च करण्याची कंपनीची योजना आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी विशेष सावधगिरी बाळगा
अलीकडेच बिगबास्केटने नुकत्याच झालेल्या फंडिंग राउंडमध्ये २०० दशलक्ष डॉलरचा निधी उभारला. परिणामी कंपनीचे मूल्यांकन ३.२ अब्ज डॉलर इतके झाले आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, 2025 पर्यंत ऑनलाइन बिगबास्केटचे शेअर बाजारात लिस्ट केले जाऊ शकतात. टाटा समूहाची ऑनलाइन बिगबास्केट किराणा कंपनी तीन वर्षांच्या आत शेअर्सची यादी करेल, असे ब्लूमबर्गने बुधवारी सांगितले.
Gold Price Today सोने चांदीच्या दरात मोठी वाढ
याबाबत माहिती देताना, बिगबास्केटचे मुख्य वित्तीय अधिकारी विपुल पारेख म्हणाले की, बेंगळुरू-मुख्यालय असलेली ई-कॉमर्स कंपनी पुढील 24 ते 36 महिन्यांत IPO लाँच करेल. याआधी, कंपनी खाजगी निधी उभारण्याचा विचार करत आहे. बिगबास्केटने विविध खाजगी फंड कंपन्यांद्वारे सुमारे 200 डॉलर दशलक्ष जमा केले आहेत.
तसेच कंपनी सध्या निधी उभारण्याच्या प्रक्रियेत आहे आणि भारतभर आपला व्यवसाय विस्तारण्याची योजना आखत आहे. यामुळे अॅमेझॉन आणि रिलायन्स इंडस्ट्री सोबत तगडी स्पर्धा होऊ शकते. पारेख यांच्या मते, बिगबास्केटचा पुरवठा करणाऱ्या डार्क स्टोअर्सची संख्या वाढवेल. कंपनी मार्चपर्यंत सुमारे 200 ते 300 आउटलेट उघडण्याचा विचार करत आहे. तर बिगबास्केट सध्या 55 शहरांमध्ये कार्यरत असून 75 शहरांमध्ये विस्तार करण्याचा विचार करत आहे. तसेच कंपनीचे स्टोअर सुमारे 450 शहरांमध्ये आहेत आणि पुढील वर्षी आणखीन 80 ते 100 शहरांमध्ये स्टोअर वाढू शकते, असेही पारेख म्हणाले आहे.
आज पेट्रोल डिझेलचे दर स्वस्त कि महाग? पहा