आता FD वर मजबूत मिळवा व्याज! ही बँक देतेय इतक्या टक्क्यापर्यंत व्याज


वेगवान नाशिक

नवी दिल्लीः खासगी क्षेत्रातील DCB बँकेने ₹2 कोटींपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, नवीन दर 21 डिसेंबर 2022 पासून लागू होतील. सुधारणेनंतर, बँक आता 7 दिवस ते 120 महिन्यांच्या मुदत ठेवींवर सर्वसाधारण लोकांसाठी 3.75% ते 7.60% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 4.25% ते 8.10% पर्यंत व्याजदर देत आहे.
DCB बँकेत 700 दिवस ते 36 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी ठेवींवर सर्वाधिक व्याजदर सध्या बिगर ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.85% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 8.35% आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी विशेष सावधगिरी बाळगा

तर  बँक 7 दिवस ते 45 दिवसात परिपक्व होणाऱ्या ठेवींवर 3.75% व्याजदर देत आहे, तर 46 दिवस ते 90 दिवसांच्या कालावधीत परिपक्व होणाऱ्या ठेवींवर 4.00% व्याजदर ऑफर करत आहे. तसेच 91 दिवस ते सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीत परिपक्व होणाऱ्या ठेवींसाठी, DCB बँक 4.75% व्याज दर देत असून सहा महिने ते १२ महिन्यांपेक्षा कमी कालावधीत परिपक्व होणाऱ्या ठेवींसाठी, व्याज दर ६.२५% आहे.

या पिकाची लागवड करून शेतकरी होणार श्रीमंत

तसेच 12 ते 18 महिन्यांत परिपक्व होणाऱ्या ठेवींवर आता 7.25% व्याज मिळेल, तर पुढील 18 ते 700 दिवसांत परिपक्व होणाऱ्या ठेवींवर आता 7.50% व्याज मिळेल. 700 दिवस ते 36 महिन्यांच्या ठेवींवर बँक कमाल 7.85% व्याजदर देईल. DCB बँक 36 महिने ते 120 महिन्यांच्या कालावधीत परिपक्व होणाऱ्या ठेवींवर 7.60% व्याज दर देणार आहे.

या कंपनीच्या कार होणार महाग

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *