दिशा सालियन मृत्यू प्रकरणी देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा


वेगवान नाशिक

मुंबईः  गेल्या काही दिवसांपूर्वी दिशा सालियन मृत्यूचं प्रकरण घडलं होतं. तर या प्रकरणावरून विधानसभा आणि विधानपरिषदेत आदित्य ठाकरेंना घेरण्याचं प्रयत्न केला असून विविध प्रश्न उपस्थित करत चौकशीची मागणी शिंदे गट आणि भाजपाने केली होती. तसेच  यावरून झालेल्या गोंधळामुळे पाचवेळा विधानसभा तहकूबही करण्यात आली.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी विशेष सावधगिरी बाळगा

त्यानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली असून “दिशा सालियनचे प्रकरणत मुंबई पोलिसांकडे असून याप्रकरणाचे ज्यांच्याकडे पुरावे असतील, त्यांनी द्यावे. यासंदर्भात एसआयटीच्या माध्यमातून चौकशी केली जाणार,” अशी घोषणा विधानसभेत बोलताना फडणवीस यांनी केली आहे.

Gold Price Today सोने चांदीच्या दरात मोठी वाढ

फडणवीस म्हणाले, दिशा सालियन प्रकरणाची चौकशी कधीच सीबीआयकडे नव्हती. सुशांतसिंह राजपूत प्रकरणाची चौकशी सीबीआय कडे गेली असून सीबीआयला ज्यावेळी या केससंदर्भात विचारलं तेव्हा सीबीआयने ही केस आपल्याकडे नाही असं सांगितलं, त्यामुळे आम्ही या केसचा तपास केलेला नाही.

तसेच  दिशा सालियन प्रकरणात सीबीआयला विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी हे प्रकरण आमच्याकडे नाही, असं सांगितलं. त्यासंदर्भात सीबीआयचा कोणताही क्लोजर रिपोर्ट नाही आहे. याबाबत जे काही पुरावे मांडले जात आहेत, त्याच्या आधारावर कोणताही राजकीय आकस न ठेवता, निपक्षपणे चौकशी करण्यात येईल,” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

गुंतवणूकदारांसाठी चांगली बातमी! हा समूह नवीन IPO आणण्याच्या तयारीत

 

 

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *