वेगवान नाशिक
सध्या राज्यात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून त्यात अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी नागपूरच्या न्यासाच्या भूखंड घोटाळ्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरली होती.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी विशेष सावधगिरी बाळगा
तर या भूखंड घोटाळाप्रकरणी नागपूर न्यायालयाच्या खंडपीठाने एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा मिळाला असून या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 जानेवारीला होणार आहे.
आज पेट्रोल डिझेलचे दर स्वस्त कि महाग? पहा
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास मंत्री असताना नागपूर न्यासाची 86 कोटींची जमीन बिल्डरांना अवघ्या 2 कोटी रुपयात विकल्याचा असा गंभीर आरोप गंभीर केला होता. यावर विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना हा सर्व व्यवहार नियमानुसार जमिनीचा व्यवहार झाला आहे.
तसेच कोर्टाने या व्यवहारावर कोणतेही ताशेरे ओढले नाहीत असं शिंदे यांनी स्पष्ट केलं असून मी माझ्या अधिकाराचा गैरवापर केलेला नसून भूखंड प्रकरणात कोणताही गैरव्यवहार झालेला नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का, नाशिकचा हा मोठा नेता शिंदे गटात दाखल