बुलेट ट्रेनबाबत मोठी बातमी, या वर्षापर्यंत काम होणार पुर्ण


वेगवान नाशिक

2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत बुलेट ट्रेनची बरीच चर्चा झाली होती. केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर लवकरच बुलेट ट्रेनचा प्रवास मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, भारतातील पहिली बुलेट ट्रेन लवकरात लवकर रुळावर यावी, अशीही सरकारची इच्छा आहे. ही ट्रेन मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणार आहे. याबाबत अनेकदा वेगवेगळ्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. पण यावेळी नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड चे व्यवस्थापकीय संपादक राजेंद्र प्रसाद यांनीच बुलेट ट्रेन कधी सुरू होणार हे सांगितले आहे.

दिशा सालियन मृत्यू प्रकरणी देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

NHSRCL चे व्यवस्थापकीय संपादक राजेंद्र प्रसाद यांनी सांगितले की बुलेट ट्रेनचे काम पुढील 5 वर्षांत म्हणजे 2027 पर्यंत पूर्ण होणार असून जून 2026 पर्यंत सूरत ते बिलीमोरा दरम्यान ट्रायल रन केली जाईल. ते म्हणाले की, बांधकाम वेगाने सुरू असून आतापर्यंत 220 किमी पायलिंगचे काम पूर्ण झाले आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी विशेष सावधगिरी बाळगा

तसेच  प्रसाद म्हणाले, “रेल्वे प्रकल्पाच्या बांधकामात अनेक स्वदेशी भाग वापरले जात आहेत आणि ही देशासाठी अभिमानाची बाब आहे. तर 220 किलोमीटरचे पायलिंगचे काम पूर्ण झाले असून आम्हाला खात्री आहे की जून 2026 पर्यंत बिलीमोरा ट्रायल रन सुरतमधून होईल.

त्यानंतर पुढे प्रसाद म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने भूसंपादनात खूप सहकार्य केले असून आतापर्यंत ९८ टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. त्याबाबतची निविदा काढण्यात आली असून महाराष्ट्रात लवकरच सिव्हिल इंजिनीअरिंगचे काम सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या पिकाची लागवड करून शेतकरी होणार श्रीमंत

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *