वेगवान नाशिक
मुंबई : पुढील वर्षी होणाऱ्या बीएमसी निवडणुकीपूर्वी नाशिकमध्ये उद्धव गटाला मोठा धक्का बसला असून नाशिक ग्रामीणचे प्रमुख सुनील पाटील यांनी उद्धव गटाला सोडचिठ्ठी देत मोठा धक्का देत शिंदे गटात प्रवेश केला आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी विशेष सावधगिरी बाळगा
दरम्यान ठाकरे गटाला नाशिकमध्ये बसलेला हा पहिला धक्का नसून यापूर्वी भाऊसाहेब चौधरी हेही उद्धव गट सोडून शिंदे गटात गेले होते. अशाप्रकारे शिंदे गटाने उद्धव यांना सलग दोन मोठे धक्के दिले आहेत.
आज पेट्रोल डिझेलचे दर स्वस्त कि महाग? पहा
तसेच यापूर्वी 15-16 डिसेंबर रोजी नाशिकमध्येच उद्धव ठाकरे गटाचे 11 माजी नगरसेवक एकनाथ शिंदे गटात दाखल झाले होते. उद्धव गटातून अजय बोरस्ते, सूर्यकांत लवाटे, सुवर्णा मटाले, आरडी धोंगडे, ज्योती खोले, सुदाम डेमसे, जयश्री खर्जुल, प्रताप मेहरोलिया, चंद्रकांत खाडे, पूनम मोगरे, राजू लवाटे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिन भोसले यांनीही शिंदे गटात प्रवेश केला.
माहितीनुसार, या सर्व नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या मुंबईतील ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली आणि पक्षात प्रवेश केला. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे हेही उपस्थित होते. त्याचवेळी उद्धव गटाचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी नाशिकमध्ये पक्षात फूट नसल्याचा इन्कार केला होता.
त्यामुळेआता माजी मंत्री, माजी आमदार आणि माजी नगरसेवक यांचा प्रवेश सोहळा कधी आणि कुठे होतो हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
Gold Price Today सोने चांदीच्या दरात मोठी वाढ