वेगवान नाशिक
मुंबईः गेल्या महिन्यात अनिल देशमुख यांचा विशेष सीबीआय न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर देशमुख यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी वैद्यकीय कारणास्तव जामीन मागितला होता. त्यानंतर आता अनिल देशमुख यांना सीबीआय प्रकरणात अखेर जामीन मिळाला होता. मात्र अनिल देशमुख यांना हायकोर्टाने मोठा दणका दिला असून देशमुख यांच्या जामीनावरील स्थगिती हायकोर्टाने वाढवली आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी कायदेशीर बाबींमध्ये गाफील राहू नये!
तसेच सीबीआयने हायकोर्टाची विनंती मान्य केली असून या प्रकरणाची 27 डिसेंबर 2022 पर्यंत स्थगिती दिली आहे. तर देशमुख यांना मनी लॉड्रिंग प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला होता. मात्र त्यांच्या जामिनावर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने आक्षेप घेतला होता. याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने जामीन देण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.
त्यामुळे यावर उच्च न्यायालयाने आणखी 10 दिवस वाढवून देण्यात आले असल्यामुळे अनिल देशमुख यांचा मुक्काम पुन्हा वाढला आहे.
Share Market शेअर बाजारात जोरदार उसळी, सेन्सेक्स ६२ हजारांच्या वर उघडला
दरम्यान न्या. मकरंद कर्णिक यांच्या एकलपीठाने माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांची १२ डिसेंबर रोजी जामिनावर सुटका केली. मात्र, न्यायालयाने स्वत:च्याच आदेशावर १० दिवस स्थगिती दिल्याने सीबीआयने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, सुनावणी जानेवारी २०२३ मध्ये ठेवली आहे. कारण सुट्टीकालीन न्यायालय बसत नसल्यामुळे न्यायालयाने अनिल देशमुख यांच्या जामिनावर दिलेली स्थगिती ३ जानेवारीपर्यंत कायम करावी. म्हणून हा निर्णय न्यायालयाने दिला आहे.
कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय