Share Market शेअर बाजारात जोरदार उसळी, सेन्सेक्स ६२ हजारांच्या वर उघडला


वेगवान नाशिक

मुंबईः देशांतर्गत शेअर बाजाराची आज चांगली सुरूवात झाली असून सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकात तेजी दिसून आली आहे. त्यामुळे बाजारासाठी चांगले संकेत यशस्वी ठरले असून बाजाराची सुरुवात हिरव्या चिन्हावर झाली आहे. बुधवारी सेन्सेक्स २८९ अंकांनी वाढून ६१,९९२ च्या पातळीवर उघडला. तर सुरुवातीच्या व्यापारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ५ पैशांनी घसरून ८२.७५ वर पोहोचला. आज गेल्या दोन सत्रांचा दबाव मागे टाकून गुंतवणूकदारांनी आज जोरदार खरेदी केली आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी कायदेशीर बाबींमध्ये गाफील राहू नये!

शेअर बाजार उघडताच बीएसई सेन्सेक्स २९१.४२ अंक म्हणजेच ०.४७ टक्क्यांनी वाढून ६१,९९३.७१ वर उघडला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीने ४९.८५ अंकांनी म्हणजेच ०.२७ टक्क्यांच्या वाढीसह १८,४३५.१५ अंकांवर सुरुवात केली. त्यामुळे भारतीय शेअर बाजारासाठी आज किंचित वाढ होण्याची चिन्हे आहेत आणि SGX निफ्टी आज हिरव्या रंगात व्यवहार करत आहे. या आधारावर देशांतर्गत बाजाराच्या सुरुवातीमध्येही वाढ होण्याचे संकेत मिळाले. याशिवाय काल अमेरिकन बाजारातील व्यवहारही तेजीसह बंद झाले.

जर तुम्हाला कमी किमतीत कार हवी असेल तर ही शानदार कार करा खरेदी, किंमत आणि फिचर्स जाणून घ्या

तसेच बँक निफ्टीतील मजबूत वाढीच्या जोरावर आज शेअर बाजारात तेजी दिसून येत असून बँक निफ्टीमध्ये २०५ अंकांनी वाढून जवळपास ०.५ टक्क्यांची उसळी पाहायला मिळत आहे. सध्या बँक निफ्टी ४३,५६५ च्या पातळीवर असून बाजाराला मजबूत आधार देत आहे. तर एनएसईच्या क्षेत्रांबद्दल बोलायचे तर, आज PSU बँका सुमारे २ टक्क्यांनी उडी घेऊन व्यवहार करत आहेत. तर रिअल्टी क्षेत्र १.०४ टक्के आणि आयटी क्षेत्र १.०२ टक्क्यांनी वाढून व्यापार करत आहे. दुसरीकडे, आज एनएसईचे सर्व क्षेत्रीय निर्देशांक वाढीच्या हिरव्या चिन्हात व्यवहार करत आहेत.

तर  सेन्सेक्सच्या ३० पैकी २८ समभाग हिरव्या चिन्हात व्यवहार करत असून ITC आणि L&T समभागांचे २ समभागात तेजीचा हिरवा रंग दिसत आहेत. याशिवाय निफ्टीच्या ५० पैकी ४६ समभाग तेजीसह आणि ४ समभाग घसरणीसह व्यवहार करत आहेत.

आंतरधर्मीय विवाहाला विरोध नाही पण.., काय म्हणाले फडणवीस!


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *