त्या मागणीवरून केसरकरांचा उद्धव ठाकरेंना टोला


वेगवान नाशिक

सध्या महामंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून विधानपरिषदेत अनेक मुद्दे मांडले जात आहे. त्यात काल दुस-या दिवशी एकनाथ शिंदे यांच्यावर एनआयटी भूखंड प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले असून थेट मुख्यमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे न्यायालयाने विधानसभेत कामकाजाला स्थगिती दिली असून  या निर्णयावर ताशेरे ओढले आहेत.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी कायदेशीर बाबींमध्ये गाफील राहू नये!

तर उद्धव ठाकरेंच्या या मागणीवरून शिंदे गटाचे प्रवक्ते मंत्री दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, सरकार बदलल तेव्हा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढावी, असे म्हणणारे उद्धव ठाकरे अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम दिसतात. जेव्हा महाविकास आघाडी सत्तेत आली, तेव्हा महाराष्ट्राच्या जननेते मतदान केलं नव्हतं. मग ते राजीनामा देऊन पुन्हा मुख्यमंत्री झाले होते का?,” असा खोचक सवाल दीपक केसरकर यांनी केला आहे.

Share Market शेअर बाजारात जोरदार उसळी, सेन्सेक्स ६२ हजारांच्या वर उघडला

तसेच उद्धव ठाकरे विधिमंडळात आल्यावर त्यांच्या पक्षाच्या कार्यालयात जायला पाहिजे होतं. पण, थेट काँग्रेसच्या कार्यालयात गेले. बाळासाहेब ठाकरेंनी कधीही काँग्रेसच्या कार्यालयात पाय सुद्धा ठेवला नसता. शेवटी पक्ष विचारधारेवर चालत असतात. एकमेकांशी संबंध कसे आहे, यावर चालत नाही. आणि जनतेच्या विकासाची कामे केली,तर जनता सुद्धा तुमच्याबरोबर राहते,” असा टोला केसरकरांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

त्यानंतर केसरकर म्हणाले, आम्ही शांतपणे काम करतोय, करुद्या. अन्यथा अशी कितीतरी प्रकरणे काढता येतील. मग लोक म्हणतील, अशा प्रकारची चिखलफेक राजकारणात सुरु आहे. ज्या घोषणा दिल्या जातात, त्याच्यापेक्षा वाईट त्यांच्याबद्दल दिल्या जातील. पण, तसे आम्ही करणार नाही, असेही दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.

शेतकऱ्यांना दिलासा! या महिन्याच्या अखेर दीड लाख टन साखर निर्यात होण्याची शक्यता, होणार फायदा

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *