वेगवान नाशिक
नाशिकः सध्या नवीन वर्ष येत असून काही दिवसांवर वर्षातील पहिला सण संक्रांत सण येत असून पतंगोत्सव करणारे प्रेमी वेगवेगळ्या पद्धतीचा मांजा वापरून पतंगोत्सव साजरा करत असतात. या पार्श्वभूमीवर जीवघेण्या नायलॉन मांजा विक्री व तो मांजा खरेदी करणाऱ्या दोघांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी असे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी नाशिक पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना दिले आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी कायदेशीर बाबींमध्ये गाफील राहू नये!
दरम्यान मागील काही वर्षापासून जीवघेण्या नायलॉन मांजाचा वापर वाढत असून जीवघेण्या नायलॉन मांजाच्या वापरामुळे अनेकांना आजपर्यंत आपले प्राण गमवावे लागले आहे तर कित्येक जण जखमी झाले आहे. तसेच न्यायालयाचा आदेश झुगारून बंदी असतानाही नायलॉन मांजाची विक्री नाशिक शहरात होत आहे. त्यामुळे नाशिक शहरात नायलॉन मांजाचा वापर वाढल्याने अनेक ठिकाणी या जीवघेण्या मांजाची सर्रास विक्री होताना पहावयास मिळत आहे.
Share Market शेअर बाजारात जोरदार उसळी, सेन्सेक्स ६२ हजारांच्या वर उघडला
याबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत असताना देखील प्रशासन ठोस पाऊले उचलताना दिसत नाही. मांजामुळे अनेकांच्या जीवावर बेतले आहे. धारदार नायलॉन मांजामुळे अनेकांना गंभीर दुखापत झाल्याचे निदर्शनास येत असते. तसेच संक्रांतीच्या काळात हजारो पक्षी नायलॉन मांज्यामुळे पंख व मान कापून मृत पावतात. बाजारात नायलॉन मांजा विरोधात धाड सत्र राबविले जाते मात्र तरीही नायलॉन मांजा विक्री सर्रास सुरु आहे.
त्यामुळे नाशिक शहरात या बेकायदेशीर कृत्याला यातून खतपाणी मिळत असल्याने यावर तात्काळ बंदी आणून नायलॉन मांजा विक्री करण्यासोबत खरेदी करणाऱ्यांवर सुद्धा मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी जेणेकरून विक्री करणारा व खरेदी करणाऱ्यांवर धाक निर्माण असे निवेदनात म्हटले आहे.
वैद्यकीय मंत्र्यांकडून डॉक्टर, तंत्रज्ञांच्या संदर्भात मोठी घोषणा