वेगवान नाशिक
नाशिकः शहरातील अंबड परिसरात एका पतीने पत्नीला जळत्या लाकडाने मारहाण केल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी संशयित पतीविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी कायदेशीर बाबींमध्ये गाफील राहू नये!
याबाबत अधिक माहिती अशी की, कामावरून उशीरा आल्याच्या कारणावरून संशयित पतीने पत्नीला जळत्या लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली असून प्रविण निंबा सुर्यवंशी असे संशयित पतीचे नाव आहे.
प्रमिला प्रविण सुर्यवंशी राहणार डी जी पी नगर अंबड यांच्या फिर्यादीनुसार घरी परतण्यास काही उशीर झाला यामुळे संतप्त पतीने रागाच्या भरात लाकडी दांडक्याने मारहाण करत शिवीगाळ केली असून पत्नीला जखमी केले आहे.
Share Market शेअर बाजारात जोरदार उसळी, सेन्सेक्स ६२ हजारांच्या वर उघडला
म्हणून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात संशयित पती प्रविण सुर्यवंशी विरूद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास अंबड पोलीस करत आहे.
या चित्रपटाबाबत शाहरूख खानवर परमहंस आचार्यांचे मोठे वक्तव्य