गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! या कंपन्या पुढील वर्षी एवढ्या लाख कोटींचा आयपीओ आणणार


वेगवान नाशिक

तुम्ही देखील IPO मध्ये पैसे गुंतवत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. 2023 मध्ये भारतीय IPO मार्केटमध्ये खूप खळबळ उडेल. पुढील वर्षी सुमारे 89 कंपन्या दलाल स्ट्रीटचे दरवाजे ठोठावण्याच्या तयारीत आहेत. या कंपन्या आयपीओद्वारे १.४ लाख कोटी रुपये उभारू शकतात.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी कायदेशीर बाबींमध्ये गाफील राहू नये!

याआधी 2021 मध्ये, एकूण 63 कंपन्यांनी IPO च्या माध्यमातून 1.19 लाख कोटी रुपये उभे केले. त्याच वेळी, या वर्षी नोव्हेंबरपर्यंत 33 कंपन्यांनी आयपीओद्वारे 55145.80 कोटी रुपये उभे केले आहेत. पुढील वर्षी IPO आणण्याच्या तयारीत असलेल्या कंपन्यांमध्ये Oyo, Fabindia, Yatra Online आणि Mankind India यांची नावे प्रमुख आहेत.

राज्यात लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात येणार-  देवेंद्र फडणवीस

अहवालानुसार, गेल्या वर्षी आलेल्या अनेक बड्या आयपीओच्या पराभवामुळे अनेक गुंतवणूकदार आता कंपन्यांच्या मूल्यांकनाबाबत खूप सावध झाले आहेत. फिस्डमचे प्रमुख नीरव करकेरा म्हणतात की, नवीन-युगातील तंत्रज्ञान कंपन्या अनैसर्गिक मूल्यमापनाने बाजारात सूचिबद्ध झाल्या. लिस्टिंग दरम्यान यामध्ये मोठी घसरण झाली आहे. मार्केट रेग्युलेटर सेबी देखील याबाबत चिंतेत असून मूल्यांकन प्रक्रिया पारदर्शक करण्याचा सेबीचा प्रयत्न आहे.

Share Market शेअर बाजारात जोरदार उसळी, सेन्सेक्स ६२ हजारांच्या वर उघडला

तसेच  गेल्या वर्षी आलेल्या काही IPO मुळे गुंतवणूकदारांचे नुकसान झाले असेल, परंतु काही वर्षांमध्ये IPO मार्केट अल्फा परतावा देण्यास सिद्ध झाले आहे. विशेष बाब म्हणजे IPO मधून गुंतवणूकदारांनी प्रचंड नफा कमावला आहे. त्यातच आता OYO, Fabindia , आधार हाउसिंग फायनान्स, यात्रा ऑनलाइन, मॅनकाइंड फार्मा या कंपन्यांसाठी आयपीओ येऊ शकतो.

मोठी बातमी, देशात कोरोनाचा उद्रेक, पुन्हा बंधन, पुन्हा मास्कसक्ती?

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *