लव्ह जिहादला आळा घालण्यासाठी कायद्याची मागणी, हिंदु संघटना


वेगवान नाशिक

नागपूर- महाराष्ट्रात लव्ह जिहाद आणि धर्म परिवर्तन कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी आज हिंदू संघटना आंदोलन करणार आहेत. हिंदु जागृती समितीच्या वतीने आज दुपारी 12 वाजता नागपूर विधान भवनासमोर आंदोलन करण्यात येणार असून यासाठी यशवंत स्टेडियम ते नागपूर विधानभवन असा मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही लव्ह जिहाद आणि धर्मांतर कायदा लवकरात लवकर लागू करावा, अशी हिंदू संघटनांची मागणी आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी कायदेशीर बाबींमध्ये गाफील राहू नये!

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत माहिती दिली की, महाराष्ट्र लव्ह जिहाद कायदा लागू करण्यास तयार आहे. त्यासाठी इतर राज्यात लागू असलेल्या या कायद्याचा अभ्यास केला जात आहे. याआधीही देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, राज्य विधानसभेच्या आगामी हिवाळी अधिवेशनापूर्वी असा कायदा आणण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

Share Market शेअर बाजारात जोरदार उसळी, सेन्सेक्स ६२ हजारांच्या वर उघडला

त्याबाबत आम्ही सर्व पैलूंचा अभ्यास करत आहोत. लव्ह जिहाद रोखण्यासाठी सरकार येत्या काही दिवसांत कायदा आणणार आहे, असा दावा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी माध्यमांना दिलेल्या निवेदनात केला आहे.

दरम्यान श्रद्धा वालकरच्या हत्येनंतर महाराष्ट्रात लव्ह जिहाद कायदा लागू करण्याची मागणी जोर धरत असून श्रद्धा वालकरची हत्या तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताब पूनावाला याने केल्याचा आरोप आहे. त्यामुळे श्रद्धा वालकरच्या हत्येचा तपास लव्ह जिहादच्या कोनातून करावा, अशी मागणी करत हिंदू संघटनांनी गेल्या महिनाभरात महाराष्ट्रभर निदर्शने केली आहेत.

नगरपरिषद परिसरात वाहने लावताना नागरिक,व्यापाऱ्यांनी खबरदारी घ्यावी,मुख्याधिकारी यांचे आवाहन


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *