वेगवान नाशिक
मुंबई : देशात कोव्हिडची लाट पुन्हा धोकादायक पद्धतीने संसर्ग करत आहे. तर दुसरीकडे कोरोनाचा फैलाव सुरू असतानाच, व्यवस्था अपुरी ठरत असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यातच आता काही दिवसांत नवीन वर्षाचे आगमन होणार असून भारतीयांच्या सेलिब्रेशनला कोरोनाचे ग्रहण तर लागणार नाही ना?
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी कायदेशीर बाबींमध्ये गाफील राहू नये!
चीनमधील कोरोना व्हायरसमुळे झालेला आक्रोश आता भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये ऐकू येत आहे. चीनमध्ये कोरोनाच्या महास्फोटाचा धोका पाहता भारत सरकारही सतर्क झाले असून त्यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. यामुळेच आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना विषाणूच्या नवीन स्वरूपावर लक्ष ठेवण्यासाठी संक्रमित आढळलेल्या नमुन्यांचे जीनोम अनुक्रम वाढविण्याचे आवाहन केले आहे.
मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाबाबत हायकोर्टाचे महत्वाचं विधान
तर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आज म्हणजेच बुधवारी जपान, दक्षिण कोरिया, ब्राझील, चीन आणि अमेरिकेत कोविड-19 च्या प्रकरणांमध्ये अलिकडच्या दिवसांत झालेल्या वाढीमुळे साथीच्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत. कोरोनाच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा विचार करता आज सकाळी ११ वाजल्यापासून कोविड-१९ च्या परिस्थितीचा आढावा घेतला जात असून या बैठकीनंतर काही महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वे जारी होऊ शकतात.
तसेच चीनमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर चीनमधून येणारे प्रवासी, पर्यटक यांच्याबाबत महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. याशिवाय भारतात मास्क देखील बंधनकारक करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भारतातील सर्वात स्वस्त 110cc ABS बाईक लॉन्च, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या