वेगवान नाशिक
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात वैद्यकीय मंत्र्यांकडून मोठी घोषणा करण्यात आली असून राज्याचे वैद्यकीय मंत्री गिरीश महाजन यांनी राज्यात लवकरच डॉक्टर, तंत्रज्ञांच्या जवळपास साडेचार हजार जागांवर भरती करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच ही भरती प्रक्रिया टीसीएसच्या माध्यमातून पार पडणार आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी कायदेशीर बाबींमध्ये गाफील राहू नये!
तसेच याआधी एमपीएसच्या माध्यमातून ३०० डॉक्टरांची भरती केली. पण सध्या २८ टक्के जागा रिक्त आहेत. यासंदर्भात आम्ही मेडिकल बोर्ड तयार करणार आहोत आणि त्या माध्यमातून लवकरच पदभरती केली जाईल. यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. असे गिरिश महाजन म्हणाले आहे. तसेच राज्य आत्तापर्यंत १० टक्के हॉस्पिटल आणि ९० टक्के हाफकिन अशी औषधे खरेदी होतं, मात्र आता हे प्रमाण आम्ही बदलून आता ३० टक्के हॉस्पिटल आणि ७० टक्के हाफकिन अशी औषधे खरेदी केली जाईल, अशीही माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे.
Share Market शेअर बाजारात जोरदार उसळी, सेन्सेक्स ६२ हजारांच्या वर उघडला
दरम्यान नागपूर, मुंबई, पुणे, औरंगाबाद येथे रुग्णांची संख्या मोठी असते. व्हेंटिलेटर तत्काळ उपलब्ध करायची म्हटलं तरी ते शक्य होतं नाही. कारण रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात आहे. त्यासाठी लवकरच जास्तीत जास्त व्हेंटिलेटर उपलब्ध करण्यात येईल, असंही महाजन म्हणाले.
त्यानंतर महाजन म्हणाले, राज्यात १० हजार खोल्या मेडिकल विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलसाठी बांधण्याची गरज असून आम्ही सीएसअरच्या माध्यमातुन हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच २०२४ पर्यंत जे जे सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल करत असल्याचंही गिरीश महाजन यांनी सांगितलं.
शेतकऱ्यांना दिलासा! या महिन्याच्या अखेर दीड लाख टन साखर निर्यात होण्याची शक्यता, होणार फायदा