वेगवान नाशिक
गेल्या काही दिवसांपासून राज्यात महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नावरून वाद सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात कर्नाटक सरकारचे सातत्याने चिथावणीखोर वक्तव्ये केली जात आहेत. त्यामुळे सीमावाद उफाळून आला असून दोन्ही राज्यात तणावाचे वातावरण आहे. अशातच याबाबत देशाच्या गृहमंत्र्यांनी मध्यस्थी करुनही कर्नाटक सरकारच्या कुरापती सुरुच असून महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधींना बेळगावमध्ये प्रवेशबंदी करुन लोकशाही मुल्ये पायदळी तुडविण्याचं काम कर्नाटक सरकारनं केलं आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी कायदेशीर बाबींमध्ये गाफील राहू नये!
त्यामुळे माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, सरकारनं सीमावादावर जशास तसं उत्तर द्यायला हवं. सीमाभागातील गावं महाराष्ट्रात कशी येतील, यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी आपल्या सरकारनं आक्रमक भूमिका घेतली पाहिजे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना उत्तर दिलं पाहिजे, असं स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे.
Share Market शेअर बाजारात जोरदार उसळी, सेन्सेक्स ६२ हजारांच्या वर उघडला
तसेच कर्नाटक सरकारची दडपशाही यापुढे सहन करणार नसल्याचे सांगत महाराष्ट्र सरकारने सीमा भागातील मराठी भाषिकांच्यामागे ठामपणे उभे राहण्याची मागणी अजित पवार यांनी केली आहे.
शेतकऱ्यांना दिलासा! या महिन्याच्या अखेर दीड लाख टन साखर निर्यात होण्याची शक्यता, होणार फायदा