Nashik कारमधून साडेसात लाख रूपयांचा ऐवज लंपास


वेगवान नाशिक

नाशिक : शहरात एका कारमधून साडेसात लाखांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. सदर घटना दि. १९ रोजी रात्रीच्या सुमारास घडली असून याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी कायदेशीर बाबींमध्ये गाफील राहू नये!

याबाबत अधिक माहिती अशी की, देवीसिंग जिवाराम पुरोहित (रा. गिल्स रेसीडेन्सी, आनंदवल्ली, पाईपलाईन, गंगापूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार, ते दि. १९ रोजी  रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास त्यांचे जीजा कृष्णा पुरोहित यांच्यासमवेत घरी जाण्यासाठी क्रेटा कारने (एमएच १५ एचएम १४५३) निघाले होते. त्यावेळी  गडकरी सिग्नलच्या दिशेने ते जात असतानाच शिंगाडा तलाव रस्त्यावरील युनिक मोटर्स दुकानासमोरच त्यांच्या कारचे टायर पंक्चर झाले असता ते दोघे जीजा साले कारमधून उतरले आणि डिक्कीतून त्यांनी स्टेफनी काढली.

Share Market शेअर बाजारात जोरदार उसळी, सेन्सेक्स ६२ हजारांच्या वर उघडला

त्यानंतर  ते कारचे टायर बदलत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या कारचा दरवाजा उघडून कारच्या सीटवर ठेवलेली काळी बॅग, ज्यात ७ लाख ७० हजार ४०० रुपयांची रोकड, ३ हजारांचे ॲपलचे ॲडप्टर असे ७ लाख ७३ लाख ४०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार टेमगर हे पुढील तपास करीत आहेत.

वैद्यकीय मंत्र्यांकडून डॉक्टर, तंत्रज्ञांच्या संदर्भात मोठी घोषणा

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *