वेगवान नाशिक
मुंबईः काही दिवसांपासून राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकींची रणधुमाळी पाहायला मिळत होती. त्यात 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर झाल्या हाेत्या त्यापैकी 7 हजार 681 ग्रामपंचायतींंमध्ये निवडणूका पार पडल्या. तर या राज्यातील 7 हजार 950 ग्रामपंचायतीचे आज निकाल लागणार आहेत.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना धनलाभाचे योग
दरम्यान राज्यातील एकूण 590 ग्रामपंचायतीच्या निवडणूका बिनविराेध झाल्या आहेत, त्यामुळे 7,135 ग्रामपंचायतींसाठी आज मतमाेजणी हाेणार आहे. या ग्रामपंचायतींच्या निवडणूकींसाठी अनेक दिग्गजांची प्रतीष्ठा पणाला लागली असून यामध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, बच्चू कडू, बाळासाहेब थाेरात, विश्वजीत कदम, राणा जगजीतसिंह तसेच देवेंद्र भुयार यांसारख्या दिग्गजांची प्रतीष्ठा पणाला लागलेली आहे.
शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत एवढ्या क्षमतेचे मिळणार सौरपंप
तसेच बिनविराेध पार पडलेल्या एकूण 590 ग्रामपंचायती पैकी ठाकरे गटाचे 65, शिंदे गटाचे 103, भाजपचे 149, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 108, काँग्रेसच्या 54 आणि इतर 111 जागांवर बिनविराेध पार पडल्या आहेत. तर ग्रामपंचायत भाजप निवडणुकीत भाजप एक नंबरचा पक्ष असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला असून भाजप आणि शिंदे गटाने 300 पेक्षा जास्त ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा त्यांनी केला आहे.
बॅंकेच्या ग्राहकांना आता हि सेवा मिळणार मोफत