वेगवान नाशिक
सर्वसामान्यांना दिलासा मिळणारी बातमी आहे. आगामी अर्थसंकल्पात महागाईचा भार कमी करण्यासाठी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा केली असून बीपीएल आणि उज्ज्वला योजनेतंर्गत येणाऱ्या नागरिकांना 500 रुपयात गॅस सिलेंडर मिळणार आहे. तर या गॅस सिलेंडरचे नवे दर 1 एप्रिलपासून उपलब्ध होणार आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना धनलाभाचे योग
तसेच प्रत्येक वर्षी उज्ज्वला योजनेतंर्गत 500 रुपये दराने 12 सिलेंडर कुटुंबाला मिळतील. याबाबत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी एका जाहीर सभेत बोलताना ही घोषणा केली आहे. तर ग्रामीण आणि गरीब कुटुंबांना गॅस सिलेंडर पुरवण्याच्या उद्देशाने 2016 मध्ये पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने ‘पंतप्रधान उज्ज्वला योजना’ सुरु केलीय.
दरम्यान उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन घेण्यासाठी काही निकष ठेवण्यात आले असून त्यानुसार अर्जदाराचं वय किमान 18 इतकं असावे आणि केवळ महिला अर्जदारांना नोंदणी करता येईल. तसेच अर्जदाराच्या कुटुंबातील इतक कोणत्याही व्यक्तीच्या नावावर LPG कनेक्शन नसावे.
बॅंकेच्या ग्राहकांना आता हि सेवा मिळणार मोफत
यासाठी ई-केवायसी अनिवार्य असून राज्यातर्फे दिल्या जाणाऱ्या रेशन कार्डच्या आधारावर अर्ज करता येणार आहे. तसेच अर्जदाराच्या पत्त्याचा पुरावा, ओळखीचा पुरावा आणि त्याच पत्त्यावर कनेक्शन आवश्यक असल्यास त्याची माहिती देणं बंधनकारक आहे. या योजनेतंर्गत 14.2 किलोच्या सिलेंडरसाठी 1600 रुपये तर 5 किलोच्या सिलेंडरसाठी 1150 रुपयांचं अर्थसहाय्य सरकारकडून दिलं जाते. तसेच तेल विपणन कंपन्या द्वारे PMUY लाभार्थ्यांना व्याजमुक्त कर्ज सुविधा उपलब्ध करुन दिली जाते. तर कर्जामध्ये LPG स्टोव्हची किंमत 1 बर्नर स्टोव्हसाठी 565 रुपये तर 2 बर्नर स्टोव्हसाठी 990 रुपये आणि कनेक्शनच्या वेळी मिळालेल्या पहिल्या LPG सिलेंडरची रिफिल किंमतीचा समावेश केला जातो.
राज्यातील 7 हजार 950 ग्रामपंचायतींचे आज निकाल, गुलाल कुणाचा?