राज ठाकरेंचा नितीन गडकरींना फोन, म्हणाले…


वेगवान नाशिक

मुंबईः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच कोकण दौरा केला असून  पक्ष संघटनेसोबतच कोकणातील समस्या जाणून घेतल्या असून त्या सोडवण्याचं आश्वासन जनतेला दिलं आहे. याबाबत बोलताना राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा उल्लेख केला असून या कामाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर संवाद झाल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे सध्या या चर्चेला उधाण आल्याचं दिसत आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना धनलाभाचे योग

दरम्यान राज ठाकरे यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाबाबत  नितीन गडकरींना फोन करून माहिती दिली. जर समृद्धी महामार्गासारखा ७०० किमी लांबीचा महामार्ग इतक्या कमी वेळात होऊ शकतो. मग मुंबई-गोवा महामार्ग १६ वर्ष होऊनही पूर्ण का झालेला नाही?

मविआच्या आमदारांचा विधानसभेत गोंधळ, शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल

त्यानंतर गडकरींनी याबद्दल माहिती  दिली असून दोन कॉन्ट्रॅक्टर पळून गेले वगैरे इतर माहिती दिली. पण जनतेला या सबबी देता येत नाहीत. आता तुम्हीच वैयक्तिकरित्या यात लक्ष घालून काम लवकरात लवकर कसं पूर्ण होईल ते बघा असं गडकरींना सांगितलं आहे”, असं राज ठाकरे म्हणाले आहे.

तसेच  येत्या आठवड्याभरात काय करता येईल ते बघतो आणि कळवतो असं आश्वासन गडकरींनी दिलं असल्याचंही राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

Redmi Note 12 Pro 5G भारतात या तारखेला होणार लॉन्च, मिळतील हे फीचर्स

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *