नाशिक बाजार समितीच्या निवडणूकीला स्थगिती


वेगवान नाशिक

नाशिक : गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनामुळे निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली नव्हती. त्यानंतर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून मुदत संपुष्टात आलेल्या बाजार समित्यांची निवडणूक घेण्याचे आदेश सप्टेंबरमध्ये दिले होते. त्यानुसार या निवडणुकांचा कार्यक्रमही घोषित करण्यात आला होता. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने आता नाशिक बाजार समितीच्या निवडणुकीस स्थगिती दिल्याने सुमारे साडेतीन महिन्यांसाठी ही निवडणूक पुन्हा लांबणीवर पडली आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना धनलाभाचे योग

दरम्यान  जिल्ह्यात नाशिकसह एकूण १४ बाजार समित्यांचा यात समावेश असल्याने इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले होते. मात्र, दरम्यानच्या काळात विविध कार्यकारी सहकारी संस्था व ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणे शिल्लक असल्याने सहकार प्राधिकरणाकडून निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे.

चाणक्य नितीः ज्या लोकांमध्ये हे तीन गुण असतात, त्यांनाच समाजात मिळतो सन्मान

तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकांच्या परिणामी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सहकार विभागाकडून २० डिसेंबरपर्यंत निवडणुकांना स्थगिती देण्यात आली होती. पण त्यानंतर १६ डिसेंबर रोजीच स्थगिती उठविण्यात आली असून सहकार विभाग निवडणूक घेण्याच्या तयारीत होते. मात्र सध्या  जिल्ह्यातील १८८ ग्रामपंचायतींमध्ये रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली असून याची मतमोजणी आज पार पडली आहे.

Nashik शहरात वाहतूक पोलिसांची विनाहेल्मेट चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई

या पार्श्वभूमीवर सदानंद नवले यांनी उच्च न्यायालयात ग्रामपंचायतच्या निवडणुका सुरू असल्याने नाशिक बाजार समितीच्या निवडणुकीला स्थगिती देण्याची विनंती याचिकेद्वारे केली होती. त्यामुळे आता नाशिक, त्र्यंबकेश्वर, पेठ या तीन तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीला स्थगिती मिळाली असून अन्य १३ बाजार समितीच्या निवडणुका वेळेतच पार पडणार आहेत.

या बॅंकेच्या गृहकर्ज व्याजदरात वाढ, जाणून घ्या


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *