एनआयटी भूखंड प्रकरणावरून विरोधक आक्रमक, CM च्या राजीनाम्याची मागणी


वेगवान नाशिक

विधिमंडळांचे अधिवेशन सुरू असून आज हिवाळी अधिवेशनाच्या दुस-या दिवशी विधानपरिषदेत नागपूर इन्व्हेस्टमेंट ट्रस्टचा (NIT) मुद्दा गाजला आहे. यावरून अधिवेशनात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत  थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची  मागणी केली आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना धनलाभाचे योग

दरम्यान  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकासमंत्री असताना 83 कोटींचा भूखंड 2 कोटी रुपयांना विकल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत केला. यामुळे एकच गदारोळ उडाला आहे.न्यायालयाने या प्रकरणात ताशेरे ओढल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी एकनाथ खडसेंनी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्यामदतीसाठी धावून आले. तर विरोधी पक्षनेते आणि खडसे सभागृहाची दिशाभूल करत आहेत असा आरोप केल्यामुळे आजचं कामकाज स्थगित करण्यात आलंय.

राज्यातील ग्रामपंचायतींवर भाजप-शिंदे गटाचा झेंडा? बावनकुळेंचा दावा

तसेच राजीनाम्याच्या  मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी दोन वेळा गोंधळ घातला. त्यामुळे तिस-या वेळी गोंधळ सुरू झाल्याने कामकाज स्थगित करण्यात आलं. त्यानंतर विरोधकांचे सर्व आरोप उपमुख्यमंत्री फडणवीसांनी फेटाळून लावले असून वकिलाने मांडलेली भूमिका न्यायालयाचे ताशेरे असल्याचा विरोधकांचा बनाव असल्याचा फडणवीसांनी गंभीर आरोप केला.

या सरकारी बँकेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

या  प्रकरणात कोर्टाने ताशेरे ओढल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा मागावा अशी आग्रही मागणी उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या बैठकीत मांडली. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा आणि आमदार विकास निधी हे दोन मुद्दे कामकाजात लावून धरावे यावर उद्धव ठाकरे आग्रही होते.

या बॅंकेच्या गृहकर्ज व्याजदरात वाढ, जाणून घ्या

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *