आंतरधर्मीय विवाहाला विरोध नाही पण.., काय म्हणाले फडणवीस!


वेगवान नाशिक

काही दिवसाआधी लव्ह जिहाद प्रकरणाबाबत राज्य शासनाकडून मोठं पाऊल उचलण्यात आलं असून आंतरधर्मीय विवाहांवर लक्ष ठेवण्यासाठी  एक समिती स्थापन करण्यात आली आहे. तर या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाने संपूर्ण देश तसेच राज्याच्या हिवाळी अधिवेशनातही हे प्रकरण चांगलंच गाजलं असल्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीसाठी आपण विशेष पोलीस पथक नेमणार असल्याचं राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना धनलाभाचे योग

तसेच आंतरधर्मीय विवाहाबद्दलची आपली भूमिका मांडताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आंतरधर्मीय लग्नाला माझा विरोध नाही. पण गेल्या काही काळामध्ये षडयंत्र करून विवाह होत आहेत. वर्षभरात मुलीला त्रास दिला जातो. ती परत येते आणि मग अशा घटना बाहेर येताना दिसतात. त्यामुळे मी कोणत्याही धर्माविरोधात नाही. पण अशा गोष्टी होतायत हे सत्य आहे आणि ते स्विकारावे लागेल.

या सरकारी बँकेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

याबाबत तसे वेगवेगळ्या राज्यांनी जे कायदे केले आहेत,त्यांचा अभ्यास केला जाईल. कोणत्याही महिलेची फसवणूक होऊ नये, ही राज्याची भूमिका राहील. त्यामुळे आंतरधर्मीय विवाहाबद्दलच्या कायदयाबाबत मी स्पष्टच सांगतो की, श्रद्धा वालकर हत्या प्रकरण हे मानवतेला काळीमा फासणारं असून तिने केलेली तक्रार मागे घेण्याबाबत अजून कोणताही राजकीय किंवा बाहेरच्या व्यक्तीचा दबाव असल्याचं आढळून आलेलं नाही. त्यामुळे तक्रार करून एका महिन्यात ती मागे घेतली आहे.

फडणवीस पुढे  म्हणाले, “२३ तारखेला तक्रार केली आणि पुढच्या महिन्यात १९ तारखेला ती मागे घेतली. या एका महिन्यांत पोलिसांनी काय केलं? पोलिसांवर राजकीय दबाव होता का याबाबत आम्ही माहिती घेतो आहे. कारवाई का करण्यात आलेली नाही, याचा तपास करत आहोत. अशा प्रकारच्या घटनेत महिलेची तक्रार आली तर तिला बोलावून माहिती घेतली पाहिजे, अशा सूचना दिल्या आहेत. असं फडणवीस म्हणाले.

चाणक्य नितीः ज्या लोकांमध्ये हे तीन गुण असतात, त्यांनाच समाजात मिळतो सन्मान

 

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *