वेगवान नाशिक
मुंबई : आज विधिमंडळाच्या अधिवेशनाचा दुसरा दिवस असून महाविकास आघाडीची बैठक संपल्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी काँग्रेस कार्यालयातून विधानभवनाच्या पायऱ्यांपर्यंत मोर्चा काढून निषेध व्यक्त केला असून भूखंडाचा श्रीखंड खाणारे मुख्यमंत्री हाय हाय.. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्या, बिल्डर धार्जिण्या मुख्यमंत्र्याचा निषेध असो, अशा घोषणा देत विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर शिंदे सरकारचा तीव्र शब्दांत निषेध केला.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना धनलाभाचे योग
तसेच कामकाज सुरु झाल्यावरही मविआच्या आमदारांनी शिंदे-फडणवीसांना स्थगितीच्या मुद्द्यावरुन घेरलं असून मविआच्या काळातील अनेक कामांना शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिल्याने महाराष्ट्र विकासापासून वंचित राहत आहे. मविआच्या विकासकामांना स्थगिती देण्याचं सरकारचं काय? अशी विचारणा करत मविआने जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे त्यावर स्थगिती दिलेली ७० टक्के कामे पुन्हा सुरु केली असून उर्वरित कामांच्या बाबतीतही लवकरच विचार करुन निर्णय घेऊ, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मविआ आमदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे.
राज्यातील 7 हजार 950 ग्रामपंचायतींचे आज निकाल, गुलाल कुणाचा?
दरम्यान त्यानंतर भाजपतर्फे विधानभवनाच्या पायऱ्यांवर नारेबाजी करण्यात आली असून ‘सरकारमध्ये असलो म्हणून कुणाचेही खोटे खपवून घेणार नाही. खोटे बोला रेटून बोला, असे महाविकास आघाडीचे धोरण आहे. हे खपवून घेतले जाणार नाही,’ असे दरेकर म्हणाले आहे.
चाणक्य नितीः ज्या लोकांमध्ये हे तीन गुण असतात, त्यांनाच समाजात मिळतो सन्मान