वेगवान नाशिक
लासलगावः भारतीय सैन्य दलात नोकरी लावून देतो अशी आमिष दाखवत तरूणांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी लासलगाल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाणक्य नितीः ज्या लोकांमध्ये हे तीन गुण असतात, त्यांनाच समाजात मिळतो सन्मान
याबाबत अधिक माहिती अशी की, गणेश सुकदेव नागरे (रा. पाचोरे, ता. निफाड) यांनी दिलेल्या फिर्यादीत बापू छबु आव्हाड रा. आंबेगाव व त्याच्या तीन साथीदारांनी गणेश व त्याचा मित्र आकाश रामनाथ यादव (रा. शिरवाडे) यांचा विश्वास संपादन करून संगनमताने सैन्य दलात नोकरीस लावून देतो, असे सांगून सैन्य दलातील गणवेश घालून खोटे ओळखपत्र दाखवून सेवक असल्याचे भासवून नागरेकडून 5 लाख 45 हजार तर त्याचा मित्र यादव कडून 5 लाख 75 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना धनलाभाचे योग
याबाबत या तरूणांच्या लक्षात येताच या प्रकरणी चार जणांविरोधात लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एकास अटक केली आहे. तसेच याबाबत पुढील तपास पोलिस करत आहे.
आंतरधर्मीय विवाहाला विरोध नाही पण.., काय म्हणाले फडणवीस!