वेगवान नाशिक
हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (HDFC) ने गृहकर्जावरील रिटेल प्राइम लेंडिंग रेट मध्ये बदल केला असून HDFC ने RLPR मध्ये 0.35 टक्के वाढ केली आहे. तर आजपासून नवे दर लागू होणार आहेत. तसेच गृहकर्जावरील व्याजदरात वाढ झाल्यामुळे कर्जाचा मासिक ईएमआयही वाढणार आहे. त्यात 800 आणि त्यापेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर असलेल्यांसाठी HDFC चा व्याजदर आता 8.65 टक्क्यांपासून सुरू होईल.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना धनलाभाचे योग
एचडीएफसी वेबसाइटनुसार, अॅडजस्टेबल रेट होम लोनला फ्लोटिंग किंवा व्हेरिएबल रेट लोन असेही म्हणतात. ARHL मधील व्याजदर HDFC च्या बेंचमार्क दराशी म्हणजेच रिटेल प्राइम लेंडिंग रेट (RPLR) शी जोडलेला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने 7 डिसेंबर 2022 रोजी आपल्या पतधोरण बैठकीत रेपो दर 0.35% ने 5.9% वरून 6.25% पर्यंत वाढवला. रेपो दरात वाढ केल्यानंतर अनेक सरकारी आणि खासगी बँकांनी गृहकर्जाचे दर वाढवले आहेत.
बॅंकेच्या ग्राहकांना आता हि सेवा मिळणार मोफत
त्यात HDFC ने मे 2022 पासून कर्जदरात 225 बेसिस पॉइंट्सने वाढ केली असून HDFC चा दावा आहे की ती अजूनही बाजारात सर्वात कमी व्याजदरावर गृहकर्ज देत आहे. तर स्टेट बँक ऑफ इंडियाचा किमान गृहकर्ज दर, जो भारतातील सर्वोच्च गृहकर्ज पुरवठादार आहे, वार्षिक 8.75 टक्के आहे. या दराने, SBI 750 पेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकांना गृहकर्ज देते. त्याचप्रमाणे, ICICI बँकेचा सण ऑफर दर 8.75 टक्क्यांपासून सुरू होतो. 750 अधिक क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकांसाठी देखील हे उपलब्ध आहे. बँकेचा सर्वसाधारण दर ८.९५ टक्क्यांपासून सुरू होतो.
Redmi Note 12 Pro 5G भारतात या तारखेला होणार लॉन्च, मिळतील हे फीचर्स