वेगवान नाशिक
महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणूक विजयाचा जल्लोष सुरू झाला असून 3500 च्यावर ग्रामपंचायतींमध्ये भारतीय जनता पक्षाचे समर्थीत उमेदवार निवडून आले आहे. त्यात 1000च्या पेक्षा जास्त ठिकाणी एकनाथ शिंदे यांचे उमेदवार निवडून आले आहेत. तर आतापर्यंत हाती आलेल्या निकालांपैकी निम्म्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर भाजप आणि शिंदे गटाने विजय मिळविला आहे. त्यामुळे भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विधानभवन परिसरात मोठा जल्लोष केला आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना धनलाभाचे योग
तसेच आमदार बावनकुळेंनी परिसरात लाडू वाटून आनंद साजरा केला असून माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ग्रामपंचायतीच्या निकालामध्ये शिंदे आणि फडणवीस सरकारच्या कामाची छाप दिसून आली आहे. पहिल्या टप्प्यात आलेल्या सुमारे 1000 ग्रामपंचायतीच्या निकालापैकी 513 ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या असल्याचा दावा बावनकुळे यांनी केला आहे.
या सरकारी बँकेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय
त्यानंतर बावनकुळे म्हणाले, राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसची अवस्था अपक्षांपेक्षा वाईट झाली असून 140 ग्रामपंचायती शिंदेच्या शिवसेनेने राखल्या आहेत. त्यामुळे संपुर्ण निकाल येईल तेव्हा 3 हजार ग्रामपंचायती भाजपाच्या असतील तर 1 हजार ग्रामपंचायती शिंदेच्या शिवसेनेच्या असतील, असा दावा बावनकुळे यांनी केला आहे.
चाणक्य नितीः ज्या लोकांमध्ये हे तीन गुण असतात, त्यांनाच समाजात मिळतो सन्मान