ग्रामपंचायत निवडणुकीत विजयानंतर दोन गटात हाणामारी, विजयी उमेदवाराचा मृत्यू


वेगवान नाशिक

जळगावच्या जामनेर तालुक्यातल्या टाकळीत दोन गटात झालेल्या दगडफेकीत भाजपच्या विजयी उमेदवाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. धनराज श्रीराम माळी ( ३२) असे या मृत झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना धनलाभाचे योग

दरम्यान ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दोन गट एकमेकांना भिडले असून यात दोन गटात हाणामारी आणि दगडफेक झाली असून त्यात माळी यांचा मृत्यू झाला आहे. तर पराभूत झालेल्या गटाकडून दगडफेक केल्याचा आरोप मृत सदस्याच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेनंतर जामनेरमध्ये तणावाचं वातावरण पसरले आहे.

चाणक्य नितीः ज्या लोकांमध्ये हे तीन गुण असतात, त्यांनाच समाजात मिळतो सन्मान

जळगावच्या  जामनेर तालुक्यातील टाकळी खुर्द या गावाची ग्रामपंचायतीची निवडणूक होती. त्यामध्ये भाजपचे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात या निवडणुकीत रिंगणात होते. तर आज या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून त्यात धनराज माळी यांचा भाऊ जितेंद्र माळी हा सरपंचपदासाठी उभा होता. त्यावेळी गावातील देवीच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी जात असताना  काही जणांनी अचानक धनराज माळी याच्यावर दगडफेक केली.

या सरकारी बँकेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

तसेच काही जणांनी लाठ्या काठ्यानी हल्ला चढवला. यावेळी डोक्यात दगड लागून दुखापत झाल्याने धनराज माळी हा गंभीर जखमी झाला. त्यामुळे जखमी धनराजला जामनेर येथील रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून मोठी खळबळ उडाली आहे.

या बॅंकेच्या गृहकर्ज व्याजदरात वाढ, जाणून घ्या

 

 

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *