वेगवान नाशिक
चांदवडः अंबासन येथील खडकजांब शिवारात एका दुचाकीस्वाराचा अपघातात झाल्याची घटना घडली असून त्याचा अकस्मात मृत्यू झाला असल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी वडनेर भैरव पोलिस स्टेशनात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना धनलाभाचे योग
मिळालेल्या माहितीनुसार, सदर अपघाताचे डॅा. पी आर कोतवाल शताब्दी हॅास्पिटल मुंबईनाका नाशिक यांनी फोनद्वारे खबर दिली असून यातील मयत महेंद्र विठ्ठल आहिरे रा. अंबासन ता. सटाणा हा दि. ११ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास दुचाकीने नाशिक ते अंबासन जात असताना दुपारी तीन वाजता खडकजांब गावाजवळ त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने कट मारल्याने तो खाली पडून व डोक्याला तसेच मेंदूला मार लागल्याने ग्रामीण रूग्णालय येथे उपचार घेऊन पुढील उपचारासाठी दि ११रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजता शताब्दी पॅास्पिटल नाशिक येथे दाखल केले.
चाणक्य नितीः ज्या लोकांमध्ये हे तीन गुण असतात, त्यांनाच समाजात मिळतो सन्मान
मात्र, उपचारादरम्यान दि १२ रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास तो मयत झाला आहे. सदर मृत्यूचे मूळ कागदपत्र मुंबई नाका पो. स्टेशन अकस्मात मृत्यू रजि.नं.०० आब्लिक २०२२ सीआरपीसी १७४ प्रमाणे दाखल असून दि १९ रोजी वडनेर भैरव पो. स्टे.या ठिकाणी प्राप्त झाल्याने अकस्मात मृत्यू रजिस्टरी दाखल करण्यात आला आहे. याबाबत गुन्ह्याचा तपास वडनेर भैरव पो. स्टेशनचे ए. एस. आय डि पी गोडे हे करत आहेत.
राज्यातील 7 हजार 950 ग्रामपंचायतींचे आज निकाल, गुलाल कुणाचा?