चाणक्य नितीः ज्या लोकांमध्ये हे तीन गुण असतात, त्यांनाच समाजात मिळतो सन्मान


वेगवान नाशिक

आजकाल आपण पाहतो प्रत्येक माणसात चांगले आणि वाईट गुण असतात. मात्र, चाणक्य नीतिनुसार ज्यांच्याकडे हे तीन गुण असतील तर त्यांना समाजात मान-सन्मान मिळतो. आणि अशा लोकांच्या मागे जग धावते आणि ते महान ठरतात. तला तर पाहूया हे तीन गुण कोणते आहेत.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना धनलाभाचे योग

प्रत्येक नात्याबद्दल गंभीर असणे

आचार्य चाणक्य सांगतात, जे आपल्या जबाबदाऱ्या पार पाडतात तसेच त्यांना नातेसंबंधांचा आदर कसा करायचा हे माहित असते. ते प्रत्येक नातेसंबंध प्रामाणिकपणे हाताळतात आणि कोणाशीही भेदभाव करत नाही. अशा लोकांना सर्वत्र सन्मान मिळतो. तसेच प्रत्येकाला त्यालाजवळ बोलण्यास आवडते. अशा लोकांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले जाते आणि त्यांचे म्हणणे अमलातही आणले जाते.

राज्यातील 7 हजार 950 ग्रामपंचायतींचे आज निकाल, गुलाल कुणाचा?

प्रत्येकाला मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असणे

जी व्यक्ती नेहमी इतरांच्या मदतीसाठी धावून जाते. ते आपल्या कृतीतून दाखवून देतात. ते कधीही तोंडाची वाफ घालवत नाहीत. असे लोक सर्वांनाच आवडत असतात. त्यामुळे अशा लोकांना त्यांच्या चांगल्या वागणुकीमुळे सर्वत्र आदर मिळतो. तसेच समाजात त्यांची प्रतिष्ठा खूप वाढते. त्यांचा सर्वत्र आदर केला जातो आणि तो सर्वांचा लाडका बनतो, असे चाणक्य नीतीत सांगितले आहे.

प्रतिकूल परिस्थितीतही संयम राखणे

चाणक्य नीतिनुसार जी व्यक्ती प्रतिकूल परिस्थितीत आणि मोठ्या संकटातही संयमी राहते. विचारपूर्वक गोष्ट करते. तसेच संकटकालीन परिस्थितीतही ते आपली प्रतिष्ठा गमावत नाहीत, ते महान ठरण्यास पात्र आहे. तसेच आनंदाच्या प्रसंगी ते फार उत्साहीही नसतात की दुःखाच्या प्रसंगी फारसे निराशही नसतात. ते समाजाला प्रकाशाच्या किरणांप्रमाणे मार्गदर्शन करतात आणि वाईट काळात प्रेरणा देतात.

बॅंकेच्या ग्राहकांना आता हि सेवा मिळणार मोफत


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *