या सरकारी बँकेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय


वेगवान नाशिक

गेल्या काही वर्षांमध्ये सरकारने अनेक बँकांचे खासगीकरण केले असून त्यात आता बँकांच्या खाजगीकरणाबाबत सरकारकडून मोठा बदल करण्यात येत आहे. अशातच सरकारने बँकेच्या खासगीकरणासाठी तयारी पूर्ण केली असून पंधरा दिवसांनंतर IDBI बॅंकेची बोली वाढण्याची शक्यता आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना धनलाभाचे योग

तसेच सरकारने  IDBI  बँकेच्या खाजगीकरणासाठी प्रारंभिक बोली भरण्याची अंतिम मुदत वाढवली होती. यानंतर आता आणखी एक मोठे अपडेट समोर येत असून आयडीबीआय बँकेच्या खरेदीदारांना करात सवलत देण्याचा सरकारचा विचार आहे. तर करात सवलत देऊन, अधिकाधिक खरेदीदारांना बोलीसाठी आकर्षित करण्याचा सरकारचा विचार असून अधिक बोलीदार दिसू लागल्याने बँकेची बोली वाढण्याची शक्यता आहे.

या बॅंकेच्या गृहकर्ज व्याजदरात वाढ, जाणून घ्या

यामुळे आता आयडीबीआय बँकेच्या खरेदीदारांना अंतिम बोलीनंतर शेअरच्या किमतीत झालेल्या वाढीवर अतिरिक्त कर भरण्यापासून दिलासा मिळेल. याबाबत बँकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, आर्थिक बोली अंतिम झाल्यानंतर बँकेच्या शेअरच्या किमतीत वाढ झाली असेल, तर खरेदीदाराला किमतीच्या वाढीवर कर भरण्यास सांगणे चुकीचे ठरेल. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान आयडीबीआय बँकेत सरकार आणि एलआयसीचा 95 टक्के हिस्सा असून सरकार आणि एलआयसीला 60.72 टक्के हिस्सा विकायचा आहे. त्यामुळे केंद्राने बँकेच्या खाजगीकरणासाठी प्रारंभिक निविदा भरण्याची अंतिम मुदत 7 जानेवारीपर्यंत वाढवली आहे.

राज्यातील 7 हजार 950 ग्रामपंचायतींचे आज निकाल, गुलाल कुणाचा?

 

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *