टीम इंडियाच्या या खेळाडूचे शानदार शतक


वेगवान नाशिक

भारतीय क्रिकेट संघासाठी एक चांगली बातमी समोर येत असून चेतेश्वर पुजाराने जवळपास चार वर्षांनी बांगलादेश दौऱ्यावर शतक झळकावले, आता त्याच्या जोडीदारानेही शतक केले आहे. पुढील वर्षी भारतामध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे, जी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी खूप महत्त्वाची आहे. अशा स्थितीत भारताच्या अनुभवी फलंदाजाची शतकी खेळी ही दिलासा देणारी बातमी आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना धनलाभाचे योग

दरम्यान खराब फॉर्ममुळे टीम इंडियातून बाहेर असलेला अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार अजिंक्य रहाणेने शतक झळकावले असून रणजी ट्रॉफीच्या मैदानावर फॉर्म मिळवण्यासाठी या दिग्गज खेळाडूने हैदराबाद संघाविरुद्ध शानदार शतक झळकावले आहे. या खेळीदरम्यान रहाणेचा तोच आत्मविश्वास आणि रंग दिसला ज्यासाठी तो ओळखला जातो.

या सरकारी बँकेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रहाणेने प्रथम युवा यशस्वीच्या साथीने डाव सांभाळला आणि नंतर शतक झळकावले.
रहाणेच्या खेळीने मुंबईची दमदार सुरुवात आणखी मजबूत केली. संथ सुरुवात करणाऱ्या या फलंदाजाने १२२ चेंडूंचा सामना करत उत्कृष्ट शतक झळकावून  या खेळीत एकूण 13 चौकार मारले आणि एक जबरदस्त षटकारही मारला आहे.

Redmi Note 12 Pro 5G भारतात या तारखेला होणार लॉन्च, मिळतील हे फीचर्स


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *