निफाडः तालुक्यात मालगाडीच्या धडकेत ५५ वर्षीय इसमाचा मृत्यू


वेगवान नाशिक

निफाडः तालुक्यात मालगाडीच्या धडकेत एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सायखेडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Astrologyआजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना प्रेमप्रकरणासाठी उत्तम दिवस

माहितीनुसार, निफाड तालुक्यातील खेरवाडी चितेगाव शिवारात मध्य रेल्वे मार्गावर एका ५५ वर्षीय इसमास माल गाडीची धडक बसल्याने त्याचा या अपघातात मृत्यू झाला असल्याची माहिती सायखेडा पोलिसांनी दि. १९ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास दिली आहे.

महत्वाची बातमी! या तारखेपासून बँकाशी संबंधितीत नियमात होणार महत्वाचे बदल

याबाबत खेरवाडी येथे रेल्वे स्थानकाचे प्रबंधक पदमाकर खैरनार यांनी सायखेडा पोलिस ठाण्यात खबर दिली की चितेगाव खेरवाडी ओढा यादरम्यान मालगाडीच्या धडकेत सदरचा अनोळखी इसम मृत्यू पावला आहे. याबाबत सायखेडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करत आहे.

महाराष्ट्रात लोकायुक्त कायदा लागू होणार- एकनाथ शिंदे


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *